टाटा समूहाची मेट्रो रेल्वे प्रकल्पाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:58 AM2019-02-28T10:58:40+5:302019-02-28T11:00:07+5:30

५ डी बीम मॉडेल तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये वेळ आणि खर्चाची बचत होत असून पुणे मेट्रो प्रकल्पासाठी या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरल्याचे उद्गार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी टाटा सन्स, टाटा रिअल्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (टीआरआयएल) उच्च-ऊर्जा प्रतिनिधी मंडळासमोर काढले.

Visit to Tata Group's Metro Rail Project | टाटा समूहाची मेट्रो रेल्वे प्रकल्पाला भेट

टाटा समूहाची मेट्रो रेल्वे प्रकल्पाला भेट

Next
ठळक मुद्दे५ डी बीम तंत्रज्ञानाचे सादरीकरणउपयोगितेबाबत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ५ डी बीम मॉडेल तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये वेळ आणि खर्चाची बचत होत असून पुणे मेट्रो प्रकल्पासाठी या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरल्याचे उद्गार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मेट्रो हाऊस येथे टाटा सन्स, टाटा रिअल्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (टीआरआयएल) उच्च-ऊर्जा प्रतिनिधी मंडळासमोर काढले.
बैठकीची सुरुवात ५डी बीम तंत्रज्ञानाच्या विस्तृत सादरीकरण सोबत झाली आणि ५डी बीमचे महत्त्व व तंत्रज्ञान प्रतिनिधी मंडळाला अवगत करण्यात आले. तसेच नागपूर व पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यात आली.
टाटा ग्रुपच्या प्रतिनिधींना महामेट्रो द्वारे ५डी बीम आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होत असलेल्या अंमलबजावणीची माहिती देण्यात आली. तसेच प्रतिनिधी मंडळाने उद्योग भवन येथे कार्यरत महामेट्रोच्या ५डी बीम वॉर रूमला भेट दिली व त्याठिकाणी ५डी बीमचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच आॅटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) सिस्टीमचा अनुभव घेण्यासाठी साऊथ एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनवर त्यांनी भेट दिली.
टाटा ग्रुप प्रतिनिधींनी महामेट्रोद्वारे नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान इतर अनेक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. मुख्य म्हणजे टाटा सन्स महामेट्रोसोबत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या एका मार्गिकेच्या निर्माण कार्यामध्ये कार्यरत आहे.
बैठकीत महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक आणि सिस्टीम) सुनील माथुर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक (टेलिकॉम) विनोद अग्रवाल, महाव्यवस्थापक(प्रशासन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (आयटी आणि इलेक्ट्रिकल) नीलम चंद्र आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच टाटा समूहातर्फे आरती सुब्रमण्यम, मुख्य डिजिटल अधिकारी तानिया रॉय चौधरी उपमहाव्यवस्थापक (इन्फ्रास्ट्रक्चर), एरोस्पेस आणि डिफेन्स (टाटा सन्स) आलोक कपूर, उपाध्यक्ष (अर्बन ट्रान्सपोर्ट) आर. के. भटनागर, सल्लागार अतुल आंबेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Visit to Tata Group's Metro Rail Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो