व्हिजिटर पास देणे बंद : नागपूर विमानतळावर हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:38 PM2019-01-22T21:38:36+5:302019-01-22T21:44:20+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे (सीआयएसएफ) अतिरिक्त जवान निगराणी करीत आहेत. एअरपोर्ट परिसरात टर्मिनल इमारतीबाहेर निगराणी वाढण्यात आली असून व्हिजिटर पास देणे बंद केले आहे.

Visitor pass stop : High alert at Nagpur airport | व्हिजिटर पास देणे बंद : नागपूर विमानतळावर हाय अलर्ट

व्हिजिटर पास देणे बंद : नागपूर विमानतळावर हाय अलर्ट

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे (सीआयएसएफ) अतिरिक्त जवान निगराणी करीत आहेत. एअरपोर्ट परिसरात टर्मिनल इमारतीबाहेर निगराणी वाढण्यात आली असून व्हिजिटर पास देणे बंद केले आहे.
सीआयएसएफचे जवान सिक्युरिटी होल्ड परिसरातील कानाकोपऱ्यात लक्ष ठेवून आहेत. टर्मिनल इमारतीबाहेर आणि सुरक्षा भिंतीच्या आत सशस्त्र जवान गस्त घालीत आहेत. अ‍ॅप्रोच रोडने येणाऱ्या  वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सीआयएसएफच्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून प्रवाशांच्या बॅगची तपासणी करण्यात येत आहे. प्रवेशद्वारातून प्रवाशांना अतिरिक्त तपासणीतून जावे लागत आहेत. विमानतळावर सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या  एजन्सीचे काही जवान साध्या वेशात गस्त घालीत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने व्हिजिटर गॅलरीकरिता पास देणे बंद केले आहे. विमानतळाच्या सुरक्षा भिंतीबाहेर निगराणी करण्यासाठी विमानळाच्या सुरक्षा एजन्सीतर्फे पोलिसांना पत्र लिहिल्याचे सीआयएसएफच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Visitor pass stop : High alert at Nagpur airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.