विठोबा समूहाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

By Admin | Published: May 26, 2017 02:55 AM2017-05-26T02:55:24+5:302017-05-26T02:55:24+5:30

आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट या क्षेत्रात आघाडीच्या विठोबा समूहाला लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय,

Vitoba Group Award for Best | विठोबा समूहाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

विठोबा समूहाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

googlenewsNext

लघु व मध्यम उद्योग मंत्रालय : देशातील १०० कंपन्यांमध्ये समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट या क्षेत्रात आघाडीच्या विठोबा समूहाला लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार आणि भारत लघु व मध्यम उद्योग फोरमच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात पुरस्काराने गौरविण्यात आले.
केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांच्या हस्ते समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन शेंडे यांना पुरस्कार, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावर्षीच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी निवडण्यात आलेल्या १०० कंपन्यांमध्ये विठोबा समूहाचा समावेश आहे, हे विशेष.
आयुर्वेदिक उत्पादनांच्या क्षेत्रात कंपनीने दिलेल्या योगदानाची दखल घेत मिश्र यांनी समूहाची प्रशंसा केली. कार्यक्रमात अ‍ॅक्सिस बँक लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका शिखा शर्मा, लघु आणि मध्यम उद्योग फोरमचे प्रल्हाद कक्कड आणि विनोद कुमार उपस्थित होते. या पुरस्कारासाठी देशभरातील ४२ कंपन्यांमधून १०० कंपन्यांची निवड करण्यात आली. एक परिपूर्ण आयुर्वेदिक उत्पादन देशातील गल्ली-चौकातील दुकानांमध्ये उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आपला प्राचीन आयुर्वेदिक खजिना आकर्षक पॅकिंग आणि विविध आकारात उपलब्ध करून देणे, हा कंपनीसाठी समाधानाचा विषय आहे. सर्व ठिकाणी विठोबा उत्पादनांची मागणी वाढत असून, ग्राहकांचा विश्वास आणि संतुष्टी विठोबाच्या चमूसाठी प्रेरणास्थान आहे.
गेल्या काही वर्षांपासून समाजात दंतरोगाचे प्रमाण वाढले असून, प्रत्येक तिसरी व्यक्ती दंतरोगाने पीडित आहे. सर्व दंतरोगांवर प्रभावी आणि आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीने तयार केलेले विठोबा दंतमंजन आणि पेस्ट एकमात्र उपाय आहे. आयुर्वेदाचा अभ्यास आणि संशोधनानंतरच मंजन व पेस्ट तयार करण्यात येते. (वा.प्र.)

Web Title: Vitoba Group Award for Best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.