‘व्हीएनआयटी’ देशात ३१ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:51 AM2019-04-10T10:51:32+5:302019-04-10T10:53:32+5:30

‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला अभियांत्रिकी गटात पहिल्या ३५ मध्ये ‘रॅन्किंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ३१ वा क्रमांक आहे.

VNIT ranked 31st in the country | ‘व्हीएनआयटी’ देशात ३१ व्या स्थानी

‘व्हीएनआयटी’ देशात ३१ व्या स्थानी

Next
ठळक मुद्दे‘राष्ट्रीय रँन्किंग’मध्ये नागपूर विद्यापीठ यंदाही पहिल्या शंभरात नाही अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापनात नागपुरातील आठ संस्था दीडशेच्या आत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅन्किंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रॅन्किंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला अभियांत्रिकी गटात पहिल्या ३५ मध्ये ‘रॅन्किंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ३१ वा क्रमांक आहे. मागील वर्षीदेखील ‘व्हीएनआयटी’चा ३१ वाच क्रमांक होता. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नाही.
देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे ‘रॅन्किंग’ ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले होते. नागपूर विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचादेखील यात समावेश होता.
सोमवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’चा देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये ३१ वा क्रमांक आहे. इतर एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय व ‘आरकेएनईसी’ (रामदेवबाबा कमला नेहरु इंजिनिअरिंग कॉलेज) यांचा क्रमांक अनुक्रमे १११ व ११२ वा आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय १३४ व्या स्थानावर आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच या ‘रॅन्किंग’मधून स्पष्ट होत आहे. नागपूर विद्यापीठद्वारे संचालित लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचा १२२ वा क्रमांक आहे. व्यवस्थापन महाविद्यालय गटात इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचे ‘रॅन्किंग’ ७० इतके आहे.

‘फार्मसी’मध्ये विद्यापीठाची प्रगती
विद्यापीठांच्या ‘रॅन्किंग’मध्ये नागपूर विद्यापीठ पहिल्या शंभरात नसले तरी ‘फार्मसी’त नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर फार्मसी विभागाला २९ वे ‘रॅन्किंग’ मिळाले आहे. मागील वर्षी विभाग ७४ व्या स्थानावर होता.

Web Title: VNIT ranked 31st in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.