व्हीएनआयटी मोजणार नागपुरातील हवेची गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 07:30 AM2021-09-02T07:30:00+5:302021-09-02T07:30:02+5:30

Nagpur News विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (व्हीएनआयटी) उपराजधानीतील हवेतील प्रदूषण व गुणवत्ता मोजण्यात येणार आहे.

VNIT will measure air quality in Nagpur | व्हीएनआयटी मोजणार नागपुरातील हवेची गुणवत्ता

व्हीएनआयटी मोजणार नागपुरातील हवेची गुणवत्ता

Next
ठळक मुद्दे व्हीएआयटीतदेखील सातत्याने प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी कायमस्वरुपी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तेथे हवेशी संबंधित २६ घटकांचे मोजमाप करण्यात येईल.


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (व्हीएनआयटी) उपराजधानीतील हवेतील प्रदूषण व गुणवत्ता मोजण्यात येणार आहे. यासंदर्भात व्हीएनआयटीतर्फे दत्तवाडी येथील संत गजानन महाराज मंदिर तसेच कामठी येथे एएक्यूएम (अ‍ॅम्बिएन्ट एअर क्वॉलिटी मॉनिटरींग) केंद्र स्थापित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकायार्ने स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे हा पुढाकार घेण्यात आला आहे. (VNIT will measure air quality in Nagpur)

या केंद्राच्या माध्यमातून हवेतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचा अभ्यास करण्यात येईल. यात सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, पीएम २.५ आणि पीएम १० (पर्टिक्युलेट मॅटर) यांच्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येईल. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत काटपताळ, डॉ. दिलीप लटाए, अशोक कारे, ए. एन. काटोले, ए. पी. सातफळे, किशोर पुसदकर, एम. डी. भिवापूरकर, एम. एन. वाटाणे, सुषमा भालेकर, धनंजय गोतमारे, श्रीराम बाटवे, एन. पी. पवार, व्ही. जी. मुदलियार, टी. बी. निघोट, प्रमोद टाले हे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Web Title: VNIT will measure air quality in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.