व्हीएनआयटीचा ‘टॉप’ विद्यापीठात समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:13 AM2017-09-16T00:13:05+5:302017-09-16T00:13:32+5:30

व्हीएनआयटीने आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. संस्थेच्या प्रगतीवर विश्वास आहे.

VNIT's 'top' university should be included | व्हीएनआयटीचा ‘टॉप’ विद्यापीठात समावेश व्हावा

व्हीएनआयटीचा ‘टॉप’ विद्यापीठात समावेश व्हावा

Next
ठळक मुद्देविश्राम जामदार यांचे प्रतिपादन : व्हीएनआयटीचा दीक्षांत समारंभ थाटात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हीएनआयटीने आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. संस्थेच्या प्रगतीवर विश्वास आहे. परंतु अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. व्हीएनआयटीने जगातील १०० प्रमुख विद्यापीठात स्थान मिळविणे हे आमचे ध्येय असून त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजीचे चेअरमन विश्राम जामदार यांनी केले.
शुक्रवारी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या (व्हीएनआयटी) १५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संचालक डॉ. नरेंद्र चौधरी, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. विश्राम जामदार म्हणाले, भारत सरकारने देशातील २० जागतिक दर्जाचे विद्यापीठ साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व्हीएनआयटीला या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यानी संशोधनावर भर देण्याची गरज आहे. व्हीएनआयटीला टॉप रँंकिंगमध्ये आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ते आव्हान म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. प्राध्यापकांप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही आपली जबाबदारी ओळखावी. उत्तर अमेरिकेच्या दौºयावर असताना तीन विद्यापीठांना भेट दिली. त्यात व्हीएनआयटीने इलनाईस इन्स्टिट्यूूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेशी शैक्षणिक करार केला असून दोन विद्यापीठांसोबत बोलणी सुरू आहे. समारंभात संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. समारंभात एकूण ११२९ विद्यार्थ्यांना पदवीने सन्मानित करण्यात आले.
सुयश निलावारला डॉ. विश्वेश्वरय्या पदक
दीक्षांत समारंभात संस्थेच्या सर्व विभागांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया बी. टेक मेकॅनिकल अभ्यासक्रमातील सुयश निलावार याला ९.८४ सीजीपीए मिळाल्याबद्दल डॉ. विश्वेश्वरय्या पदकाने सन्मानित करण्यात आले तर बी. टेक. सिव्हील अभ्यासक्रमातील अर्चना व्ही. हिला ९.२९ सीजीपीए मिळविल्याबद्दल सर्वाधिक पदकांनी सन्मानित करण्यात आले.
डॉ. कस्तुरीरंगन यांचा संदेश
इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. कस्तुरीरंगन यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. आपल्या संदेशात त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधक होण्याचे आवाहन केले. जगाच्या इतर देशाच्या तुलनेत भारतात संशोधनाची गती अतिशय कमी आहे. भारतात चांगले इंजिनिअर घडत आहेत. परंतु त्यांच्यात संशोधकांची कमतरता आहे. शिक्षणासोबत संशोधक तयार होतील, अशी शिक्षण पद्धती तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: VNIT's 'top' university should be included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.