जीवनाचे कल्याण करू शकते भगवान महावीर यांची वाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:08 AM2021-05-13T04:08:59+5:302021-05-13T04:08:59+5:30
नागपूर : विश्वशांती अमृत ऋषभोत्सव अंतर्गत श्री धर्मराजश्री तपोभूमी दिंगबर जैन ट्रस्ट व धर्मतीर्थ विकास समितीद्वारे ऑनलाईन धर्मसभा आयोजित ...
नागपूर : विश्वशांती अमृत ऋषभोत्सव अंतर्गत श्री धर्मराजश्री तपोभूमी दिंगबर जैन ट्रस्ट व धर्मतीर्थ विकास समितीद्वारे ऑनलाईन धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. यात आचार्यश्री गुप्तिनंदीजी गुरुदेव म्हणाले की भगवान महावीर यांची वाणी जीवनात स्वीकारल्यास ही वाणी जीवनकल्याण करू शकते. सकाळ संध्याकाळी देवाची भक्ती करावी. अक्षय तृतीया, अक्षय मुहूर्तावर दान करावे, वृक्षारोपण करावे, आत्मध्यान करावे. आर्यिका जिनवाणी माताजी म्हणाल्या सुख आपल्या आत्म्याचा गुण आहे. दु:खापासून मुक्ती मिळविण्यासाठी संत आपल्याला मार्ग दाखवितात. सुखासाठी धर्माचे आचरण करा. प्रेम, दया, वात्सल्यभाव ठेवणेच धर्म आहे. धर्माचे आचरण कराल तर अशुभ कर्माचा नाश होईल. धर्मसभेचे संचालन गणिनी आर्यिका आस्थाश्री माताजी यांनी केले. बुधवार १३ मे रोजी सकाळी ७.२० वाजता शांतिधारा, सकाळी ९ वाजता जिनवाणी पुत्र क्षुल्लक ध्यानसागरजी यांचे उद्बोधन होईल. सायंकाळी ७.३० वजाता रिद्धी मंत्र, भक्तामर पाठ, महामृत्युंजय जप, आरती, चालिसा होईल, अशी माहिती धर्मतीर्थ विकास समितीचे प्रवक्ता नितीन नखाते यांनी दिली.