गणवेशाऐवजी पारंपरिक वेशात राहणार स्वयंसेवक; विजयादशमी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 12:43 PM2020-10-24T12:43:11+5:302020-10-24T12:43:41+5:30
Nagpur News RSS कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यंदाचा विजयादशमी उत्सव संपूर्णत: वेगळ्या स्वरूपाचा राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यंदाचा विजयादशमी उत्सव संपूर्णत: वेगळ्या स्वरूपाचा राहणार आहे. ५० लोकांच्या उपस्थितीतच उत्सव होणार असून स्वयंसेवकांना सरसंघचालकांचे भाषण ऑनलाईन ऐकण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी ड्रेसकोडदेखील ठरवून देण्यात आला आहे. गणवेश न घालता त्यांनी पारंपरिक वेशभूषा करावी, असे सांगण्यात आले आहे.
२५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात कार्यक्रम होणार आहे. यंदा प्रात्यक्षिके होणार नसून सरसंघचालकांचे भाषण होईल. स्वयंसेवकांनी घरी राहून किंवा घराजवळ लहान गटांमध्ये सरसंघचालकांचे भाषण ऐकावे, असे सांगण्यात आले आहे.