व्हॉल्व्ह फुटला; रस्ता झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:43 AM2017-09-22T01:43:44+5:302017-09-22T01:43:56+5:30

हंसापुरी भागातील बोरीयापुरा (खाण) येथे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.

Volv split; The road went to the lake | व्हॉल्व्ह फुटला; रस्ता झाला तलाव

व्हॉल्व्ह फुटला; रस्ता झाला तलाव

Next
ठळक मुद्देबोरीयापुरा जलकुंभावरील घटना : तीन कर्मचारी जखमी; आजूबाजूच्या घरात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हंसापुरी भागातील बोरीयापुरा (खाण) येथे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. आजूबाजूच्या १५ ते २० घरात पाणी शिरले. यामुळे सामानाचे नुकसान झाले. तसेच व्हॉल्व्ह खोलणाºया कर्मचाºयासह तीन जण यात किरकोळ जखमी झाले.
पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी जलकुंभाला जोडणाºया पाईप लाईनचा व्हॉल्व्ह खोलत असताना बाजूला उभा असलेला सुरक्षा गार्ड व त्याचा एक सहकारी पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे फेकल्या गेल्याने किरकोळ जखमी झाले.
व्हॉल्व्ह खोलणारा कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभावर पोहचला. व्हॉल्व्ह खोलत असताना लगतचा पाईपचा भाग अचानक फुटला. कर्मचारी व सुरक्षा गार्ड पाण्याच्या प्रवाहामुळे बाजूला फेकले गेले. पाण्याला प्रचंड वेग असल्याने १५ ते २० फूट उंचीपर्यत पाणी उडत होते. आजूबाजूच्या नागरिकांनी घराच्या छतावरून वाहणाºया पाण्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. घटनेची माहिती मिळताच प्रभाग १९ चे नगरसेवक अ‍ॅड.संजय बालपांडे घटनास्थळी पोहचले. त्यांनी जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिकाºयांना याची माहिती दिली. थोड्या वेळात अधिकारी घटनास्थळी आले. पाण्याचा दाब कमी झाल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आऊ टलेट १० वर्षापूर्वीचे जुने आहे. ते दुरुस्त न केल्याने ही घटना घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी
पाण्याची लाईन लिकेज असल्याची तक्रार के ली होती. परंतु ओसीडब्ल्यूच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. घरात पाणी शिरल्याने फ्रीज, सोफ ा, स्वयंपाक घरातील सामानाचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी केली आहे.
खड्ड्यात नगरसेवक पडले
बोरीयापुरा जलकुंभाला पेंच -४ प्रकल्पाची पाईप लाईन जोडण्याचे काम करताना जलकुंभाजवळील मैदानात खोदकाम करण्यात आले. परंतु खड्डे व्यवस्थित बुजविलेले नाही. एका खड्ड्यावर अर्धवट स्लॅब टाकण्यात आली आहे. या खड्ड्यात पडल्याने संजय बालपांडे किरकोळ जखमी झाले.
पाणीपुरवठा बाधित
या जलकुं भावरुन पाणीपुरवठा होणाºया हंसापुरी, बोरीयापुया, ज्योतीनगर, गांजाखेत, गोळीबार चौक, टिमकी तीन खंबा आदी भागांना पाणीपुरवठा होतो. परंतु पाईप लाईन फुटल्याने काही भागांचा पाणीपुरवठा बाधित झाला.

Web Title: Volv split; The road went to the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.