पटलं तर मत द्या, नाहीतर.. नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 02:16 PM2023-03-27T14:16:43+5:302023-03-27T14:24:10+5:30

प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान

Vote if you agree otherwise don't vote.. Nitin Gadkari statement sparked discussion | पटलं तर मत द्या, नाहीतर.. नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण

पटलं तर मत द्या, नाहीतर.. नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण

googlenewsNext

नागपूर : नागपूरमध्ये रविवरी वनराई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

वनराई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गडकरी म्हणाले..

“लोकांना सांगतो, तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर नका देऊ, मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही. मी नाही तर माझ्या जागी दुसरा कोणीतरी येईल, अशा शब्दांत गडकरी यांनी आपले मत व्यक्त केले. 

जलसंवर्धनापासून तर क्लायमेट चेंजपर्यंत अनेक क्षेत्रांत प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव आहे. आणि त्या क्षेत्रात जिद्दीने काम करत आहे. मी प्रेमाने नाहीतर ठोकून करतो असे म्हणत भविष्यात याच क्षेत्रात जोमाने काम करायचे आहे. कारण, या कामातून भारताच्या अर्थव्यवस्थेसह ग्रामीण भागाचा चेहरामोहराही बदलू शकतो, असंही गडकरी म्हणाले.

Web Title: Vote if you agree otherwise don't vote.. Nitin Gadkari statement sparked discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.