मतदार शहरात, केंद्र ग्रामीणमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:28 AM2020-11-22T09:28:53+5:302020-11-22T09:28:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत अनेक घोळ असल्याचे दिसून येत आहे. मतदार शहरात राहतो आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत अनेक घोळ असल्याचे दिसून येत आहे. मतदार शहरात राहतो आणि त्याचे नाव मात्र दूरवर असलेल्या ग्रामीण भागातील मतदान केंद्रात असल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे, याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पदवीधर मतदारसंघात नागपूर विभागात एकूण २ लाख ६ हजार मतदार आहेत. त्यापैकी १ लाख २ हजार मतदार हे एकट्या नागपूर जिल्ह्यात आहेत. यातही ७० टक्के मतदार हे शहरात राहतात. जिल्ह्यात एकूण १६२ मतदान केंद्र आहेत. यापैकी १२४ मतदान केंद्र हे शहरात आहेत.
मतदार यादीत अनेक घोळ आहेत. अनेकांची नावे डबल आहेत. आता शहरातील मतदारांची नावे दूरवर असलेल्या ग्रामीण भागात असल्याचे सांगितले जाते, यामुळे मतदारांची टक्केवारी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.