२८ टेबलवर होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:13 AM2020-11-28T04:13:35+5:302020-11-28T04:13:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात प्रशासनाची तयारी जोरात आहे. निवडणुकीतील कर्मचाऱ्यांचे तिसरे ...

Voting will be held on 28 tables | २८ टेबलवर होणार मतदान

२८ टेबलवर होणार मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात प्रशासनाची तयारी जोरात आहे. निवडणुकीतील कर्मचाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण शुक्रवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडले. १ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर २ डिसेंबर रोजी मतमोजणीचे प्रात्यक्षिक (मॉकड्रील) करण्यात येईल. त्यानंतर ३ डिसेंबर मतमोजणी होईल. मतमोजणीच्या वेळी एकूण २८ टेबल राहतील, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

यावेळी निवडणूक निरीक्षक एस.आर व्ही. श्रीनिवासन हे प्रामुख्याने उपस्थित होते. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपणे पार पाडण्याचे निर्देश दिले. तसेच मतमोजणी दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतप्रदर्शन करु नये, चोख व शिस्तबध्द पध्दतीने काम करुन निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अचूक व योग्य रीतीने पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ही निवडणूक प्रक्रिया थोडी वेगळी असल्याने संबंधितांनी मोबाईल व्हॉटस्ॲप ग्रूपवर सहभागी होऊन याबाबत चर्चा करुन प्रक्रिया समजून घ्यावी, असेही सांगितले.

मतमोजणी प्रक्रियेची माहिती निशिकांत सुके यांनी सादरीकरणातून दिली. प्राथमिक मतमोजणीत पोस्टल बॅलेट पेटीतील सर्व बॅलेट खाली करुन डिक्लेरेशन व पोस्टल बॅलेट वेगवेगळे केले जाईल. डिक्लेरेशन नसल्यास, फाटले असल्यास, संशयित असल्यास ते वेगळ्या पेटीत ठेवण्यात येईल. नंतर त्यांची योग्य तपासणी करुन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल किंवा टॅब नेण्यास मनाई राहील. प्रत्येक टेबलवर बॅलेट पेटी राहील. सकाळी ७.३० वाजतापासून मतमोजणी सुरु होईल. . विस्तृत मतमोजणीमध्ये १ हजार बॅलेट पेपर राहतील. त्यातील संशयात्मक मतपत्रिका वेगळ्या केल्या जातील. या निवडणुकीत एकूण १९ उमेदवार असल्याने १९ पेट्या राहतील व संशयात्मक मतपत्रिकेसाठी एक पेटी अशा २० पेट्या राहणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत २५ मतपत्रिकेचे गठ्ठे राहणार असून त्यावर चेकलिस्ट जोडण्यात येणार आहे.

यावेळी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

पहिल्या पसंतीस प्राथमिकता

प्रथम पसंतीच्या मतास मतमोजणीत प्राधान्य देण्यात येऊन नंतर इतर पसंतीक्रमानुसार मतमोजणी होणार आहे. मतपत्रिकेत शब्दात पसंती लिहणाऱ्या मतदार, पसंतीक्रम एकाच उमेदवारांच्या समोर १,२,३ असा क्रम लिहिल्यास ते मत अवैध समजले जाणार आहे. मतदार केंद्रात असलेल्या जांभळ्या शाईच्या पेनाने पसंती क्रम लिहावा. अन्य पेनाने लिहिल्यास मत अवैध होईल. प्रथम पसंती दर्शविली नसल्यास मत अवैध होईल. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणाऱ्या मतदारास कोणत्याही पेनने पसंती दर्शविली तरी मत वैध ठरविण्यात येणार आहे. हे अपवादात्मक आहे.

Web Title: Voting will be held on 28 tables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.