वृंदन बावनकर अमेरिका दौऱ्यावर
By Admin | Published: May 30, 2017 01:50 AM2017-05-30T01:50:18+5:302017-05-30T01:50:18+5:30
भंडारा जिल्ह्यातील पवन पब्लिक स्कूलच्या संचालिका वृंदन बावनकर यांची अमेरिकेच्या उच्च प्रतिष्ठित ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्राम’साठी निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील पवन पब्लिक स्कूलच्या संचालिका वृंदन बावनकर यांची अमेरिकेच्या उच्च प्रतिष्ठित ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्राम’साठी निवड झाली आहे. हा कार्यक्रम २९ मे पासून पुढील एक महिना चालणार आहे. या कार्यक्रमात बावनकर या ‘यंग लीडर’ म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मागील १९४० पासून चालणाऱ्या या वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अमेरिकन दूतावासामार्फत व्यक्तींची निवड करून त्यांना नामांकन दिले जाते. या निवड प्रक्रियेसाठी आवेदनपत्रे स्वीकारली जात नाहीत. यापूर्वी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली होती. या कार्यक्रमासाठी आजपर्यंत निवड झालेल्या व्यक्तींमध्ये ५६५ देशांचे आजी-माजी राष्ट्रप्रमुख, १०५ पुलित्झर विजेते, ८२ अमेरिकन काँग्रेस सदस्य, आंतरराष्ट्रीय संघटनांचे २६ सदस्य आणि संयुक्त राष्ट्रसंघातील ५८ राजदूतांचा समावेश आहे.