नागपुरात पहिल्यांदाच निवडणुकीत होणार व्हीव्हीपॅटचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 09:30 PM2018-11-29T21:30:30+5:302018-11-29T21:33:18+5:30

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक या लोकसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल) या नवीन यंत्राचा वापर होणार आहे. बेंगलुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत.

VVPAT will be used for the first time in Nagpur elections | नागपुरात पहिल्यांदाच निवडणुकीत होणार व्हीव्हीपॅटचा वापर

नागपुरात पहिल्यांदाच निवडणुकीत होणार व्हीव्हीपॅटचा वापर

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर-रामटेक मतदारसंघासाठी ५,४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे आलीप्रथमस्तरीय तपासणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक या लोकसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल) या नवीन यंत्राचा वापर होणार आहे. बेंगलुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या नवरत्न कंपनीद्वारे ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यातील रामटेक व नागपूर या दोन लोकसभा मतदार संघात ४ हजार ३८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून या सर्व मतदार संघावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेतले जाणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ४ हजार ३३६ बॅलेट युनिट, ५ हजार ४८६ कंट्रोल युनिट व ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट ही नवीन (एम) तीन मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत. नवीन एम तीन मतदान यंत्रे केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या बंगळुरूया कंपनीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटसह प्रथमच व्हीव्हीपॅट(व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल)चा वापर करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणार असून मतदानाच्यावेळी मतदान कक्षामध्ये बॅलेट युनिटसोबत व्हीव्हीपॅट जोडलेले राहील. मतदानाच्यावेळी मतदार जेव्हा मतदान करतील तेव्हा व्हीव्हीपॅटचे स्क्रीनमध्ये सात सेकंदापर्यंत एक पेपरस्लीप डिस्प्ले होईल. त्यानंतर पेपरस्लीप व्हीव्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समध्ये जमा होईल. मतदारांना ही स्लीप सोबत नेता येणार नाही. या स्लीपमध्ये उमेदवाराचा बॅलेट युनिटवरील अनुक्रमांक, नाव व निवडणूक चिन्ह मुद्रित झाले असेल, अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे त्याच उमेदवाराला मत पडले आहे याची खात्री मतदार करू शकतो.
निवडणुकीपूर्वी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रापैकी बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट ही प्रथमस्तरीय तपासणी १२ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी २५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ही तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या प्रशिक्षित अभियंत्यांकडून करण्यात येत आहे. प्रथमस्तरीय तपासणीदरम्यान योग्य आढळून आलेली मतदान यंत्रेच निवडणुकीसाठी वापरण्यात येतील. तसेच नादुरुस्त आढळून येणारी यंत्रे कंपनीकडे परत पाठविण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी माहिती करून घ्यावी
या मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी सुरू असून राजकीय पक्षांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहून व्हीव्हीपॅटबद्दल माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे. व्हीव्हीपॅटसह मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी कळमना मार्केट येथील वेअर हाऊसिंग गोडाऊन विंग-सी येथे पोलीस सुरक्षेत कार्यालयीन वेळात सुरू आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: VVPAT will be used for the first time in Nagpur elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.