माैदा तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:12 AM2021-09-09T04:12:30+5:302021-09-09T04:12:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तहसील कार्यालयातील महत्त्वाच्या विभागात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने कामे खाेळंबली जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तहसील कार्यालयातील महत्त्वाच्या विभागात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने कामे खाेळंबली जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे काम न हाेताच परत जावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तहसील कार्यालयात सामान्य आस्थापना विभागात एकूण आठ पदे तर संजय गांधी निराधार याेजना विभागात पाच पदे रिक्त आहेत. तसेच उपविभागीय कार्यालयात एक पद रिक्त असल्याची माहिती आहे.
तहसील कार्यालयातील सामान्य आस्थापना विभागात एक वरिष्ठ लिपिक, तीन महसूल सहायक, चार शिपाई अशी एकूण आठ पदे रिक्त आहेत. तसेच संजय गांधी निराधार याेजना विभागात दाेन वरिष्ठ लिपिक, दाेन लिपिक व एक शिपाई अशी एकूण पाच पदे रिक्त आहेत. या १३ कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे महत्त्वपूर्ण कामांचा खाेळंबा हाेताे. काम न हाेताच आल्या पावली परत जावे लागत असल्याने तालुक्यातील नागरिकात संताप व्यक्त हाेत आहे.
तसेच तालुक्यातील दाेन मंडळ अधिकारी सेवामुक्त झाले आहेत. त्यांच्या रिक्त जागी अजूनही शासनाने नियुक्ती केली नाही. मौदा येथील मंडळ अधिकाऱ्याचे पद गेल्या दाेन महिन्यापासून रिक्त पडले आहे. या रिक्तपदाचा प्रभार खात येथील मंडळ अधिकारी डांगरे सांभाळत आहेत. चाचेर येथील मंडळ अधिकारी कुरडकर हे सेवानिवृत्त होऊन नऊ महिन्यांचा काळ उलटला. तेव्हापासून त्यांचेही पद रिक्तच आहे. येथील प्रभार निमखेडा येथील मंडळ अधिकारी बोरकर हे सांभाळत आहेत. उपविभागीय कार्यालयातील एक कनिष्ठ लिपिकाचे पद रिक्त आहे. तसेच दाेन कर्मचाऱ्यांची अन्य ठिकाणी बदली झाली आहे. परंतु त्यांना अद्यापही कार्यमुक्त केले नाही. या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यास उपविभागीय कार्यालयात एकूण तीन पदे रिक्त हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
080921\img_20210908_162428.jpg
तहसिल कार्यालयात १३ पदे रिक्त फोटो