१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग, रोज ९०० वर कॉल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:07 AM2021-04-21T04:07:51+5:302021-04-21T04:07:51+5:30

नागपूर : मागील दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. रुग्णालये आणि वैद्यकीय यंत्रणा रुग्णसेवेमध्ये गुंतली आहेत. जिल्हाभरातून ...

Waiting for 108 ambulances, 900 calls daily | १०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग, रोज ९०० वर कॉल्स

१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग, रोज ९०० वर कॉल्स

Next

नागपूर : मागील दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. रुग्णालये आणि वैद्यकीय यंत्रणा रुग्णसेवेमध्ये गुंतली आहेत. जिल्हाभरातून रुग्ण वाढत असून उपचारासाठी नागपूरकडे धाव घेत आहेत. अशा वेळी तत्काळ प्रवासाचे साधन असलेल्या १०८ रुग्णवाहिकेचे कॉल्सही वाढले आहेत. रोज सरासरी ९०० वर कॉल्स येत असून ४० च्या संख्येत असलेल्या १०८ रुग्णवाहिकांची रात्रंदिवस धावाधाव दिसत आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये ४० च्या संख्येत १०८ ॲम्ब्युलन्स आहेत. शहरासोबतच ग्रामीण भागातील रुग्णानाही ती सेवा देत असते. यापूर्वी साधारण परिस्थिती असताना २५० ते ३५० कॉल्स येत होते. यात तीन पटीने वाढ झाली आहे. १०८ रुग्णवाहिका तेवढ्याच असल्या तरी कॉल्स मात्र वाढले आहेत. अशा युद्धजन्य स्थितीतही ही यंत्रणा सेवा देत आहे. कॉल्सची संख्या वाढल्याने १०८ रुग्णवाहिकेतून रुग्ण दाखल करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या प्रवासाच्या कालावधीत रुग्णावाहिकेच्या आतच उपचारही होत आहेत, हे विशेष !

१०८ रुग्णवाहिकेला शहरातून येणारे कॉल्स अधिक आहेत. नागपुरात असलेली रुग्णालयांची संख्या, रुग्णांचे शिफ्टिंग, चाचण्यांसाठी करावी लागणारी रुग्णांची वाहतूक यासोबतच शहरातील आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण लक्षात घेता शहरातून असलेली कॉल्सची टक्केवारी अधिक दिसते.

...

- जिल्ह्यातील एकूण १०८ रुग्णवाहिका : ४०

- दररोज येणारे कॉल्स : ९०० सरासरी कॉल्स

- शहरातून येणारे कॉल्स (टक्क्यांत) – ६३%

- ग्रामीण भागातून येणारे कॉल्स (टक्क्यांत) -३७%

...

अशी वाढली रुग्णांची वाहतूक

महिना कोरोना रुग्ण इतर रुग्ण

जानेवारी-२१ १२३ ५५७४

फेब्रुवारी-२१ २०२ ६९६६

मार्च-२१ ११३२ ५६९४

...

कॉल केल्यानंतर २० मिनिटात रुग्णवाहिका हजर

सेवेसाठी कॉल केल्यावर १०८ रुग्णवाहिकेची सेवा तातडीने उपलब्ध होत आहे. शहरी भाग सरासरी २० मिनिटात रुग्णवाहिका हजर होते, तर

ग्रामीण भाग सरासरी ३० मिनिटांमध्ये रुग्णवाहिका हजर होते, असा अनुभव आहे. शहरामध्ये असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढली आहे.

...

Web Title: Waiting for 108 ambulances, 900 calls daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.