समाजकार्यचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयाेगाची प्रतीक्षा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:09 AM2021-09-11T04:09:53+5:302021-09-11T04:09:53+5:30
संघटनेच्या माहितीनुसार, २९ जानेवारी २०२१ पासून समाजकार्य महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेग लागू करण्यात आला; मात्र आठ महिने ...
संघटनेच्या माहितीनुसार, २९ जानेवारी २०२१ पासून समाजकार्य महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेग लागू करण्यात आला; मात्र आठ महिने लाेटूनही त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. अनेक जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेगानुसार समाज सेवार्थ प्रणालीमध्ये ब्राेकन पीरेडमधून काढण्यात आले आहे; मात्र केवळ नागपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. याची दखल घेऊन माहे जुलैपासून नैसर्गिक वेतनवाढ लागू करावी आणि वेतन थकबाकी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. याशिवाय समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचारी ३-४ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्रस्त आहेत. त्यांना कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण आहे. हे थकलेले वेतनही त्वरित देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र माेहिते, महासचिव डाॅ. सुधाकर थाेटे, सचिव शुभांगी टुले आदींचा सहभाग हाेता.