उत्तर विभागाला पट्टे वाटपाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:11 AM2021-08-25T04:11:23+5:302021-08-25T04:11:23+5:30
नासुप्रचा उत्तर विभाग मात्र झोपडपट्टीवासीयांच्या पट्टे वाटपात माघारला आहे. या क्षेत्रात फक्त ९४ झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप झालेले आहे. ...
नासुप्रचा उत्तर विभाग मात्र झोपडपट्टीवासीयांच्या पट्टे वाटपात माघारला आहे. या क्षेत्रात फक्त ९४ झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप झालेले आहे. त्यात इंदिरानगरमधील ५१ तर कस्तुरबानगरमधील ४३ रहिवाशांचा समावेश आहे. आनंदनगर, राहुलनगर, आझादनगर, लष्करीबाग, पंचशीलनगर, धम्मदीपनगर या वसाहतींमधील अर्ज तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. पट्टे वाटप प्रक्रियेला गती देण्याची मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांची भेट घेऊन केली. शिष्टमंडळात डॉ. दिलीप तांबटकर, राजकुमार वंजारी, शैलेंद्र वासनिक, विमल बुलबुले, नीलेश खडसे आदींचा समावेश होता. नागपूर शहरात शासनाच्या जागेवर सर्वाधिक ७० झोपडपट्ट्या असूनही जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील नझूल व महसूल विभागातील पट्टे वाटप जवळपास ठप्प झालेले आहे.
...
नागपूर शहराची लोकसंख्या -२४,५५,६६५
शहरातील झोपडपट्ट्या -४४६
नोटिफाइड झोपडपट्ट्या -२८७
नॉननोटिफाइड झोपडपट्ट्या -१५९
झोपडपट्टीधारक -८,५८,९८३
स्लम भागातील घरे -१,७१,६४५
...
शासकीय योजनेत प्रशासकीय आडकाठी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वांसाठी घरे -२०२२ या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत झोपडपट्टीवासीयांना पक्क्या घरकुलासाठी झोपडपट्टीधारकाचा पट्टा पंजीबद्ध असणे ही प्राथमिक अट आहे. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पट्टे वाटपच करण्यात आलेले नाही. यामुळे हजारो झोपडपट्टीवासीय सरकारच्या आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. याला जिल्हा प्रशासनाचे धोरण कारणीभूत आहे.
-अनिल वासनिक, संयोजक, शहर विकास मंच