नागपुरात आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:51 AM2019-04-14T00:51:44+5:302019-04-14T00:52:24+5:30
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास विकास कामे ठप्पच राहणार आहेत. याचा विचार करता मतदान होताच आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास विकास कामे ठप्पच राहणार आहेत. याचा विचार करता मतदान होताच आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना लागली आहे.
मतदान संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल होऊ शकते. यामुळे महापालिकेत तशी चर्चा आहे. मात्र अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत कोणत्याही स्वरुपाचे पत्र महापालिका प्रशासनाला मिळालेले नाही. यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.
आचारसंहितेमुळे अमृत योजना, ई-लायब्ररी, रस्ते व निविदा मंजुरी, अनुकंपावरील नियुक्त्या यासह विकास योजनांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आचारसंहितेमुळे स्थायी समितीच्या बैठकी बंद आहेत. सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एखादा प्रस्ताव तातडीने मंजूर करावयाचा असला तरी यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. १० मार्चला निवडणूक आचारसंहिता लागली. लोक सभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहे. देशातील सर्व भागातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणी होईल. त्यानंतर आचार संहिता संपणार असल्याने विकास कामांच्या फाईल मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे.
मतदान संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल करता येते. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. स्थानिक स्तरावरील विकास कामांचा प्रस्ताव मंजूर करणे गरजेचे आहे. याचा राज्यातील वा देशातील अन्य भागातील मतदानावर कोणताही प्रभाव पडणार नसल्यास अशा प्रस्तावाला मंजुरी देता येते.
शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा योजना नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अमृत योजनेच्या माध्यमातून या भागात नळाचे नेटवर्क टाकले जाणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे काम प्रलंबित आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी कर्मचाºयांच्या वारसांना महापालिकेत अनुकंपावर नियुक्ती करण्याबाबतची फाईल तयार करण्यात आली होती. संबंधित वारसांची पोलिसांनी पडताळणीही केली आहे. मात्र आचारसंहितेमुळे फाईलला ब्रेक लागले आहे.