नववर्षात वाढली प्रतीक्षा यादी
By admin | Published: December 30, 2015 03:19 AM2015-12-30T03:19:30+5:302015-12-30T03:19:30+5:30
नववर्षानिमित्त अनेक नागरिकांनी प्रवासाचा बेत आखल्यामुळे रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
रेल्वेगाड्या फुल्ल : अनेक गाड्यात ‘रिग्रेट’ची स्थिती
नागपूर : नववर्षानिमित्त अनेक नागरिकांनी प्रवासाचा बेत आखल्यामुळे रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यात भली मोठी प्रतीक्षा यादी पाहावयास मिळत असून अनेक रेल्वेगाड्यात ‘रिग्रेट’ची स्थिती आहे.
३१ डिसेंबर आणि नववर्षात अनेकजण प्रवासाचा बेत आखतात. कुटुंबासह बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे सर्वच रेल्वेगाड्यातील वेटींग वाढले आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेटींगवर प्रकाश टाकला असता प्रतीक्षा यादी वाढल्याचे चित्र दिसले. नागपुरातून मुंबईला आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. जानेवारीपर्यंत १२१०६ विदर्भ एक्स्प्रेस २०० वेटींग, १२१४० सेवाग्राम एक्स्प्रेस १४५ वेटींग, १२२९० दुरांतो एक्स्प्रेस १२९ वेटींग, १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस १४८ वेटींग आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात स्वर्णजयंती एक्स्प्रेस १५२ वेटींग, एपी संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये रिग्रेटची स्थिती, गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये ९० वेटींग, तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये ४० वेटींग, केरळ एक्स्प्रेसमध्ये रिग्रेटची स्थिती आहे. हैदराबादकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात तेलंगाणा एक्स्प्रेसमध्ये ४५ वेटींग, दक्षिण एक्स्प्रेसमध्ये ५३ वेटींग, कर्नाटक संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये ५० वेटींग आहे. याशिवाय हावडा, इटारसी, बंगळुर या मार्गावरील रेल्वेगाड्यातही वेटींगची स्थिती आहे. आणखी काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याची स्थिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)