प्रतीक्षा पाटील होणार नगराध्यक्ष

By admin | Published: May 7, 2015 02:20 AM2015-05-07T02:20:31+5:302015-05-07T02:20:31+5:30

वाडी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत सर्वाधिक १० उमेदवार निवडून आले तरी बहुमतापासून दूर असलेल्या भाजपने जुळवाजुळव करीत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला.

Waiting Patil will be the head of the city | प्रतीक्षा पाटील होणार नगराध्यक्ष

प्रतीक्षा पाटील होणार नगराध्यक्ष

Next

नागपूर : वाडी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत सर्वाधिक १० उमेदवार निवडून आले तरी बहुमतापासून दूर असलेल्या भाजपने जुळवाजुळव करीत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. भाजप- शिवसेना ‘युती’ने काँग्रेससोबत हात मिळवीत ‘अभद्र’ आघाडी तयार केली. अनूसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांना आपल्या तंबूत घेत त्यांच्याकडे नगराध्यक्षपद देण्यात येणार असून, त्या वाडीच्या पहिल्या नगराध्यक्ष बनणार आहेत.
वाडी नगर परिषद झाल्यानंतर या पहिल्याच निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या युती-आघाडीतील मित्रपक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली. प्रत्येक वॉर्डातून या चारही पक्षांनी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते.
या निवडणुकीत भाजपला १० जागेवर विजय मिळविता आला. शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेसला ४, काँग्रेसला १, बसपला ७ आणि एका जागेवर अपक्षाला यश मिळाले. २५ सदस्यसंख्या असलेल्या या नगर परिषदेत सत्तास्थापनेसाठी भाजपला आणखी तीन नगरसेवकांची आवश्यकता होती. दरम्यान भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला जवळ केले आणि अपक्ष नगरसेवकाला आपल्याकडे घेतले. बहुमतासाठी लागणारे संख्याबळ जुळविण्यात भाजपला यश आले तरी नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्यासाठी एकही सदस्य त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे नगराध्यक्षपद हे विरोधी गटाकडे तर जाणार नाही ना, अशी काहीशी शक्यता निर्माण झाली. परंतु भाजपने एक पाऊल पुढे टाकत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वॉर्डातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या प्रतीक्षा पाटील यांच्याशी हातमिळवणी करीत ‘वाडी नगर विकास आघाडी’मध्ये सहभागी करून घेतले.
काँग्रेसला एकमेव जागेवर विजय मिळाला असला तरी नगर विकास आघाडीसोबत हातमिळवणी केल्याने नगराध्यक्षपद काँग्रेसच्या सदस्याला मिळणार आहे. काँग्रेसने अभद्र आघाडी केलेली असली तरी त्यांच्यासाठी हे या पदाच्या रूपाने खूप मोठे समाधान आहे, हे निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Waiting Patil will be the head of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.