सेवानिवृत्तांना पेन्शनची प्रतीक्षा
By admin | Published: June 10, 2017 02:30 AM2017-06-10T02:30:07+5:302017-06-10T02:30:07+5:30
जून महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन जमा झालेली नाही.
इपीएफ कार्यालयाच्या चकरा मारून त्रस्त :
आठवडा उलटल्यानंतरही खात्यात रक्कम नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जून महिन्याचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन जमा झालेली नाही. साधारणत: महिन्याच्या पहिल्या तारखेला पेन्शन त्यांच्या खात्यात जमा होऊन जाते. महिन्याची ९ तारीख झाल्यानंतरही खात्यात पेन्शनची रक्कम जमा न झाल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
पेन्शनची राशी खात्यात जमा न झाल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी गेल्या आठवड्यापासून भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाचे चक्कर मारत आहे. परंतु अधिकाऱ्यांकडून कुठलीही ठोस माहिती त्यांना दिली जात नाही. पेन्शनला उशीर झाल्याचे कुठलेही कारण त्यांना दिले जात नाही. यासंदर्भात लोकमतने इपीएफओच्या नागपूर कार्यालयातून माहिती घेतली. त्यात खुलासा झाला की पेन्शनधारकांकडून जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांनी जीवन प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तरीही त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम जमा झालेली नाही. पेन्शनची रक्कम जमा न झाल्यामुळे त्रस्त कर्मचाऱ्यांनी आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमुळे देशभरातील कर्मचाऱ्यांच्या २०१५-१६ च्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेच्या व्याजाची राशी त्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नव्हती. जेव्हा की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएफच्या व्याजाची रक्कम अपलोड करण्यात आली होती. एसएमएसच्या माध्यमातून त्याची माहितीही देण्यात आली होती. पीएफ कार्यालय वेबसाईटला युनिकोडमध्ये ट्रान्सफर करण्याचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकले नव्हते. ही परिस्थिती लक्षात घेता, पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.