सी-प्लेनसाठी प्रतीक्षा
By admin | Published: April 23, 2017 02:56 AM2017-04-23T02:56:46+5:302017-04-23T02:56:46+5:30
नागपुरातून सी-प्लेनची सवारी करणाऱ्याची इच्छा असणाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
मे मध्ये निघणार निविदा : पर्यटनाशी जोडून उत्पन्नाचे साधन बनविण्याचा विचार
राजीव सिंह नागपूर
नागपुरातून सी-प्लेनची सवारी करणाऱ्याची इच्छा असणाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. अंबाझरी-कोराडी- खिंडसी तलावादरम्यानच्या मार्गात अडचणी नाहीत. परंतु, नागपूर-आनंद सागर-शिर्डी मार्गावर सी-प्लेन उडविण्यात काही अडचणी येऊ शकतात. याशिवाय हा प्रकल्प तोट्यात जाऊ नये म्हणून सर्वच बाजू तपासून पाहिल्या जात आहे. विदर्भाचे पर्यटन व वन्य क्षेत्राला याच्याशी जोडून उत्पन्नाचे साधन बनविण्याचा विचार सुरू आहे.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (एमएमबी), मुंबईच्या नियंत्रणाखाली हा प्रकल्प साकार होईल. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षीच सी-प्लेन उड्डाण भरण्याची शक्यता आहे. नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) ला अंबाझरी तलाव, कोराडी तलाव, इरइ डॅम, खिंडसी रामटेक येथे सी-प्लेन उतरविण्यात येणारी जागा, जल स्तर, पायाभूत सुविधा आदीच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. सर्वेचे काम पूर्ण झाले आहे.
मे शेवटपर्यंत निविदा काढल्या जातील. प्रक्रिया पूर्ण होण्यास आॅक्टोबर २०१७ पर्यंत वेळ लागेल. नासुप्र व महाजेनको ने सी-प्लेन चा प्रकल्प तयार करून महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड, मुंबई ला पाठविला आहे. बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्या नेतृत्वात प्रकल्पाचा अभ्यास करून विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. १५ जुलै २०१६ रोजी आयोजित बैठकीत या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता अंतर (वायब्लिटी गॅप) वर विशेष लक्ष देण्यावर भर देण्यात आला होता.
डिसेंबर २०१६ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली.