स्मार्ट आरसीची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:17 AM2017-11-05T00:17:58+5:302017-11-05T00:18:09+5:30

राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना, वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) ....

Waiting for Smart RC Waiting | स्मार्ट आरसीची प्रतीक्षा संपली

स्मार्ट आरसीची प्रतीक्षा संपली

googlenewsNext
ठळक मुद्देपेपर आरसीची कटकट थांबणार : तीन वर्षांनंतर सेवापुरवठादाराची नेमणूक

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना, वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) तब्बल तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात होते. मात्र आता हा प्रकार संपुष्टात येणार असून, साधारण १३ नोव्हेंबरपासून ‘आरसी’ला ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले जाणार आहे. याचे कंत्राट ‘रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि.’ या कंपनीला देण्यात आले आहे.
परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील ‘आरसी बुक’ला २००६ मध्ये ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले. या ‘कार्ड’च्या पुरवठ्यासाठी ‘शाँग’ या खासगी कंपनीशी करार केला होता. जून २०१४ मध्ये कंपनीचे कंत्राट संपले. विभागाने कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु यादरम्यान नव्या कंपनीला कंत्राट किंवा यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. परिणामी, डिसेंबर २०१४ पासून नव्याने नोंदणी होणाºया वाहनांना जुन्या स्वरूपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. विशेष म्हणजे, आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ यात या नव्या कामाची भर पडल्याने आणि वेळोवेळी आरसी बुक कागदाचा (प्रीप्रिंटर स्टेशनरी) तुटवडा पडत राहिल्याने प्रलंबित आरसी बुकची समस्या वाढली होती. यातच आरसी बुक बाळगताना कागदापेक्षा स्मार्ट कार्ड सोईस्कर आणि कागदाच्या तुलनेत टिकाऊ असल्याने नागरिकांकडून कागदाच्या आरसी बुकबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिवहन विभागाने पुन्हा ‘स्मार्ट आरसी बुक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी नागपूर विभागातून होत आहे. तशा सूचना परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दिल्या आहेत.
शुल्क होणार कमी
परिवहन विभागाने ‘आरसी बुक’चे ‘स्मार्ट कार्ड’ बनविण्याचे काम ‘रोजमर्टा टेक्नोलॉजीस लि.’ कंपनीला दिले असून, त्यासंबंधीचा करारही केला आहे. कंपनीला प्रति स्मार्ट कार्डमधून सुमारे ५४ रुपये ७२ पैसे मिळतील; शिवाय कंपनीला वाहन १.० प्रणालीमधून वाहन ४.० प्रणालीमध्ये डेटा रूपांतरित करावा लागणार आहे. पूर्वी या स्मार्ट कार्डचे ३९४ रुपये मोजावे लागायचे, आता साधारण २५० रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.
पेपर आरसीलाही मिळणार ‘स्मार्ट कार्ड’
गेल्या तीन वर्षांपासून वाहनधारकांना ‘पेपर आरसी’ दिली जात आहे. मात्र, आता सेवापुरवठादार नेमण्यात आल्याने ज्यांच्याकडे पेपर आरसी आहे आणि त्यांना ‘स्मार्ट कार्ड’ हवे असेल, तर त्यासाठीचा अर्ज व शुल्क ‘आरटीओ’कडे भरून त्यांना ते दिले जाणार आहे, अशी माहिती आरटीओच्या एका वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
कार्ड रीडरही येणार
स्मार्ट कार्ड खिशात असले तरी त्याला लागली ‘चीप’ रीड करण्यासाठी ‘कार्ड रीडर’ नव्हते. परंतु आता पुरवठादार हे ‘कार्ड रीडर’ही आरटीओ कार्यालयांना उपलब्ध करून देणार आहे. तसे करारात नमूद आहे.

Web Title: Waiting for Smart RC Waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.