विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपता संपेना

By admin | Published: May 24, 2017 02:29 AM2017-05-24T02:29:30+5:302017-05-24T02:29:30+5:30

विधि अभ्यासक्रमाच्या मुख्य परीक्षा संपत आल्या तरी अजूनही पुनर्तपासणीसाठी दिलेल्या उत्तरपत्रिकांचे निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आलेले नाहीत

Waiting for students to overcome | विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपता संपेना

विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपता संपेना

Next

स्वच्छता अभियानाची थट्टा : कार्यालयांच्या भिंती विद्रूप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेला पुरस्कार मिळालेले आहेत. सुंदर व स्वच्छ नागपूर असल्याचा दावा केला जातो. परंतु शहरातील सार्वजनिक ठिकाणे, महापालिक ा मुख्यालयासह शासकीय कार्यालयात ठिकठिकाणी खर्रा व पानाच्या थुंकीमुळे घाण करणाऱ्यांची कमी नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रस्त्यावर वा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करणे तर दूरच सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयातील भिंती ठिकठिकाणी थुंकल्याने विद्रूप झाल्या आहेत. महापालिका मुख्यालयात महापौर, आयुक्त यांच्यासह पदाधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. परंतु घाण करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. याकडे दुर्लक्ष केल्याने थुंकीमुळे रंगलेल्या आहेत. विद्रुपीकरणाचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे.
महापालिका मुख्यालय दोन इमारतीत विभागले आहे. जुनी इमारत व नवीन प्रशासकीय इमारतीचा यात समावेश आहे. जुन्या इमारतीच्या गेटच्या बाजूलाच हिरवळ आहे. आजूबाजूला कोठेही कचरा दिसत नाही. महापौरांच्या कक्षाच्या बाजूला कारंजे व आजूबाजूला हिरवळ आहे. परंतु येथेही कचरा व थुंकणाऱ्यांनी घाण केल्याचेही निदर्शनास येईल.
महापौरांच्या कक्षाकडून निगम सचिवांचा कक्ष व सत्तापक्षनेते यांच्या कक्षाच्या बाजूला व जुनी व नवीन इमारत
जोडणाऱ्या दालनाच्या पायऱ्यांवर ठिकठिकाणी खर्रा व पानाच्या थुंकीमुळे भिंती रंगलेल्या दिसतील. नवीन इमारतीतही असाच प्रकार सुरू आहे. या इमारतीच्या पायऱ्यांवर खर्रा व पान खाणाऱ्यांनी जागोजागी थुंकून ठेवले आहे. दिव्यांगासाठी शौचालयाची सुविधा आहे. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु पुरुषांसोबतच महिलांच्या शौचालयाच्या भिंती थुंकीमुळे रंगलेल्या आहेत. शहरातील बगिचे व सार्वजनिक मैदानातही असाच प्रकार बघायला मिळतो. याला आळा घालण्याची गरज आहे.

भंगाराच्या जागाही थुंकीमुळे रंगल्या
जुन्या इमारतीत पहिल्या माळ्यावर ठिकठिकाणी जुन्या आलमारी, तुटलेले टेबल, नादुरुस्त कूलर, भंगार ठेवण्यात आले आहे. यामुळे ये-जा करणाऱ्यांनाही त्रास होतो. भंगाराच्या बाजूलाच ठिकठिकाणी खर्रा व पान खाणाऱ्यांनी जागोजागी घाण केली आहे. असे असूनही कक्ष अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही.
कसे होणार शहर स्वच्छ
देशभरातील स्वच्छ शहराच्या यादीत नागपूरचा क्रमांक घसरला आहे. याला अनेक कारणे आहेत. अस्वच्छता हे यातील प्रमुख कारण आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिके च्या आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. परंतु कार्यालयेच स्वच्छ नसेल तर शहर स्वच्छ कसे होणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

झोन कार्यालयातही घाण
महापालिकेच्या झोन कार्यालयाचा फेरफटका मारला असता खर्रा व पानाच्या थुंकीमुळे क ार्यालय व परिसरात ठिकठिकाणी घाण असल्याचे आढळून आले. झोनच्या सहायक आयुक्तांकडून यासंदर्भात दोषीवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही.
स्वच्छता मोहीम कागदावरच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची २ आॅक्टोबर २०१४ रोजी सुरुवात केली होती. भाजपा नेत्यासह आमदारांनीही हातात झाडू धरून या अभियानात सहभाग घेतला होता. यात महापालिक ाही आघाडीवर होती. प्रशासनातर्फे स्वच्छता अभियान राबविले जात आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु या मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झालेले नाही. तूर्त ही मोहीम कागदावरच असल्याचे चित्र आहे.

 

Web Title: Waiting for students to overcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.