गरिबांच्या जीवनात आशेचा किरण जागवा

By admin | Published: April 5, 2015 02:34 AM2015-04-05T02:34:43+5:302015-04-05T02:34:43+5:30

उपाशी असलेल्या व्यक्तीला अन्न देणे, उघड्या व्यक्तीला वस्त्र देण्यासारखे दुसरे पुण्य नाही.

Wake up hope for poor people | गरिबांच्या जीवनात आशेचा किरण जागवा

गरिबांच्या जीवनात आशेचा किरण जागवा

Next

नागपूर : उपाशी असलेल्या व्यक्तीला अन्न देणे, उघड्या व्यक्तीला वस्त्र देण्यासारखे दुसरे पुण्य नाही. त्यामुळे लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्या सदस्यांनी लोकांच्या गरिबांच्या जीवनात आशेचा किरण जागवावा, असे आवाहन लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्या आंतरराष्ट्रीय संचालक अरुणा ओसवाल यांनी केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्या आठव्या प्रांतीय अधिवेशनात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा प्रांतपाल नवीन पटेल, उपप्रांतपाल विजय पालीवाल, उपप्रांतपाल राजे मुधोजी भोसले, मीना पाटील, डी. जी. वांदिले, चेतन मारवाह, हरीश आकरे उपस्थित होते. अरुणा ओसवाल म्हणाल्या, सर्वांनी शक्ती दिल्यामुळे लॉयन्स क्लब इंटरनॅशनलची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
लॉयन्स क्लबमधील सदस्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नसले तरी त्यांचे एक कुटुंब तयार झाले आहे. कुठल्याही देशात कोणतीही समस्या लॉयन्सच्या सदस्यांना आल्यास तेथील सदस्य धावून जातात. त्यामुळे सर्वांविषयी करुणा बाळगून लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. लक्ष्मीकांत राठी यांनी लॉयन्स क्लबचा कायदा आणि प्रक्रिया सादर केली. राजे मुधोजी भोसले यांनी आगामी वर्षात अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. विजय पालीवाल यांनी सदस्यता नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली. नवीन पटेल यांनी मागील वर्षात ४ लाख ८० हजार नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले. यावेळी डी. जी. वांदिले, हरीश आकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचा सत्कार करण्यात आला.
लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे दिवंगत सदस्य बशीरुद्धीन खान, स्वाती भिसे, सत्वनसिंग बग्गा, प्रवीण वेल्दी, माधव अहिरकर, धन्नालाल जाजू, लालचंद त्रिकोटी, भागचंद बजाज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रेया खराबे हिने गीत सादर केले. संचालन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले. कार्यक्रमाला लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Wake up hope for poor people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.