नागपुरात वॉलमार्ट-फ्लिपकार्टला व्यापाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:31 AM2018-07-04T01:31:27+5:302018-07-04T01:34:53+5:30
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) संयुक्त विद्यमाने वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट या विदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी झालेल्या कराराला धरणे-आंदोलन करून विरोध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) संयुक्त विद्यमाने वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट या विदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्यासाठी झालेल्या कराराला धरणे-आंदोलन करून विरोध करण्यात आला.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या नावे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले. वॉलमार्टने फ्लिपकार्टची ७७ टक्के भागीदारी १६ अरब डॉलरमध्ये खरेदी केल्यामुळे वॉटमार्टची भारतात किरकोळ व्यवसायात पाय रोवण्याची महत्त्वाकांक्षा यामुळे पूर्ण होणार आहे. दोन्ही कंपन्यांचा प्रतिकूल परिणाम किरकोळ व्यवसाय, व्यापारी आणि अर्थव्यवस्थेवर पडणार आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, कराराच्या माध्यमातून वॉलमार्ट विदेशी उत्पादनांची भारतात मोठ्या प्रमाणात विक्री करेल. त्याचा प्रतिकूल परिणाम किरकोळ व्यवसायावर होणार आहे. वॉलमार्ट वस्तूंच्या खरेदीपासून विक्रीपर्यंत नियंत्रण करून किरकोळ व्यवसात मनमानी करण्याची दाट शक्यता आहे.
एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी म्हणाले, वॉटमार्ट आणि फ्लिपकार्ट व्यवहाराच्या माध्यमातून अमेरिका पुन्हा एकदा ईस्ट-इंडिया कंपनी स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचा परिणाम भारतातील सहा कोटी किरकोळ व्यापाऱ्यांवर होणार आहे.
धरणे-आंदोलनात चेंबरच्या अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, माजी अध्यक्ष मयूर पंचमतिया, उपाध्यक्ष राजू व्यास, अश्विन मेहाडिया, सचिव संजय अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव फारुखभाई अकबानी, रामअवतार तोतला, जनसंपर्क अधिकारी, शब्बार शाकीर, कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर रक्षक, गजानन गुप्ता, मनोज लुटरिया, प्रभाकर देशमुख, प्रताप मोटवानी, राजकुमार गुप्ता, राजू माखिजा, संतोष काबरा, सूर्यकांत अग्रवाल, राजेश ओहरी, शंकर सुगंध, व्यापार प्रतिनिधी सुभाष जोबनपुत्र, किशोर धाराशिवकर, सलीम अजानी, जगदीशप्रसाद तोतला, आनंद भुतडा, अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.