मेट्रोचे ‘चला नागपूर’ अभियान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:52 PM2018-10-30T23:52:13+5:302018-10-30T23:52:37+5:30

आपण कधी सापशिडी हा खेळ खेळलात काय? कदाचित लहानपणी तर नक्कीच हा खेळ खेळला असालच. आता हा खेळ परत खेळण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. बालपणीचा खेळ खेळून सर्वांना आनंद होणार आहे. या खेळामध्ये प्रत्यक्ष सहभागीदेखील घेता येईल. आयोजन महामेट्रो, मनपा आणि शहरी वाहतूक संस्थेच्यावतीने १ नोव्हेंबर ‘चला नागपूर’ या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.

'Walk Nagpur' campaign of Metro | मेट्रोचे ‘चला नागपूर’ अभियान 

मेट्रोचे ‘चला नागपूर’ अभियान 

Next
ठळक मुद्देमहामेट्रो, जीआयझेड, मनपाचा १ रोजी संयुक्त उपक्रम

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपण कधी सापशिडी हा खेळ खेळलात काय? कदाचित लहानपणी तर नक्कीच हा खेळ खेळला असालच. आता हा खेळ परत खेळण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. बालपणीचा खेळ खेळून सर्वांना आनंद होणार आहे. या खेळामध्ये प्रत्यक्ष सहभागीदेखील घेता येईल. आयोजन महामेट्रो, मनपा आणि शहरी वाहतूक संस्थेच्यावतीने १ नोव्हेंबर ‘चला नागपूर’ या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.
सापशिडीच नाहीतर यासारखे विविध खेळ खेळले जाणार आहे. यासाठी नागपुरातील विविध ठिकाणे ठरविण्यात आली आहेत. २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान शहरी विकास मंत्रालयातर्फे आयोजित अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या निमित्याने ‘पब्लिक आऊट रिच डे’ संकल्पनेंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे आणि जास्तीत ज्यास्त नागरिकांनी सायकलचा वापर करण्याच्या उद्देशाने अनोखी संकल्पना राबविली जात आहे. १ नोव्हेंबरला पहाटे ६ ते सायंकाळी ७ पर्यंत विविध खेळ आणि उपक्रम होणार आहे. वॉकथॉनची सुरुवात जपानी गार्डन, सेमिनरी हिल्स येथील वॉकर्स स्ट्रीट येथे सकाळी ७ पासून होणार आहे. त्याचप्रमाणे वॉकर स्ट्रीट, सिव्हील लाईन्स (रामगिरी रोड) येथे सकाळी ६ ते ९ पर्यंत ग्रीन स्ट्रीट कार्निव्हलमध्ये नागरिकांना नागरी वाहतूक प्रकल्पाची माहिती देण्यात येणार आहे. व्हीएनआयटी गेटसमोर ‘पॉप-अप पार्क’ची संकल्पना राबविली जाणार आहे.
समारोप धरमपेठ येथील ट्रॉफिक पार्कमध्ये सायंकाळी ५.३० वाजता होणार असून विजेत्यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल. एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना सायकलचे महत्त्व पटवून देण्यात येईल, शिवाय नागरिकांना सायकल चालविण्याची शपथ देण्यात येणार आहे. जीआयझेडच्या प्रकल्प व्यवस्थापक सारा हॅबरसॅक यांनी प्रकल्पाची प्रशंसा केली आहे.

Web Title: 'Walk Nagpur' campaign of Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.