कळमेश्वर शहराची ‘ग्रीन सीटी’कडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:25 AM2021-01-08T04:25:46+5:302021-01-08T04:25:46+5:30

आशिष साैदागर लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहर हिरवेगार व्हावे तसेच पर्यावरणाचा समताेल साधण्यास मदत व्हावी यासाठी नगर परिषद ...

Walk towards ‘Green City’ of Kalmeshwar city | कळमेश्वर शहराची ‘ग्रीन सीटी’कडे वाटचाल

कळमेश्वर शहराची ‘ग्रीन सीटी’कडे वाटचाल

Next

आशिष साैदागर

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : शहर हिरवेगार व्हावे तसेच पर्यावरणाचा समताेल साधण्यास मदत व्हावी यासाठी नगर परिषद प्रशासनाने कळमेश्वर-ब्राह्मणी शहराच्या हद्दीत एकूण ९८७ राेपट्यांची लागवड केली आहे. या राेपट्यांच्या संगाेपनाची जबाबदारही पालिका प्रशासनाने स्वीकारली असून, प्रशासनाचे या राेपट्यांकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण झाडे सुस्थितीत आहेत. यात रेल्वे क्रॉसिंगजवळ कडूनिंबाच्या झाडांचे छाेटे वन तयार करण्यात आले आहे. ही झाडे आता चार ते पाच फूट उंच झाली आहेत. त्यांना रंगरंगाेटीही केली आहे.

कळमेश्वर शहरातील विविध रस्त्यांलगत १०० वर्षांपूर्वीची काही कडुनिंबाची झाडे आहेत. त्यात कडनिंबाच्या नवीन झाडांची भर पडली आहे. नागपूरहून कळमेश्वर शहरात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेले कडुनिंबाचे वन लक्ष वेधून घेते. या वनात कडुनिंबाची एकूण २२७ झाडे आहेत. ब्राह्मणी येथील गजानन मंदिर परिसरात १४, मुसळे लेआऊटमध्ये १२, चिंतामणी नगरात ११, वैशाली नगरात १५, साईनगरात १५, गोतमारे ले-आऊटमध्ये २६, इंदिरानगरात १७, डांगे ले-आऊटमध्ये २४, शिवाजीपार्कमध्ये ५६, गोडखैरी रोडवर १२, नगर परिषद शाळा क्रमांक-१च्या आवारात ३१, पोतदार नर्सिंग होमच्या मागे ८३, पठाण ले-आऊटमध्ये १४, बुधवार बाजारात १४, गाडगे ले-आउटमध्ये १६, नगर परिषद हायस्कूलच्या आवारात २०, साई मंदिर परिसरात १४, शिव मंदिर परिसरात १५, अग्निशमन दल रोड लगत ५६, एमआयडीसी पाण्याची टाकीजवळ ७५, नागपूर बायपासलगत ८८, एमआयडीसी परिसरात ४२, केएसएल कॉलनीत ५, बाजार चौकात ५, तलावासमोर १८, ब्राह्मणी येथील शिवमंदिर परिसरात ७, शाळा क्रमांक-२च्या आवारात १६, शाळा क्रमांक-३च्या आवारात १८ झाडे लावण्यात आली असून, ही आता माेठी झाली आहेत. त्यामुळे शहर लवकरच हिरवेगार हाेणार आहे.

...

कळमेश्वर-ब्राह्मणीला हिरवेगार,स्वच्छ व सुंदर शहर करण्याचा मानस आहे. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यासाठी पालिका पदाधिकारी व कर्मचारी सहकार्य करीत आहेत. नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’प्रमाणे नागरिकांनी ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ असा विचार करायला हवा. शहरातील मोकळ्या व इतर जागेवर झाडे लावणार असून, ती जगविली जाईल.

- स्मिता काळे़, मुख्याधिकारी

नगर परिषद, कळमेश्वर-ब्राह्मणी

...

शासनाने २०१७-१८ मध्ये निधी मंजूर केला होता. याअंतर्गत शहरात तीन-चार ठिकाणी ‘ग्रीन बेल्ट’ तयार करून मोठी झाडे लावण्यात येत आहेत. ही झाडे मोठी झाल्यावर त्यांचा नागरिकांनाच फायदा हाेणार आहे. शहराची ‘ग्रीन सिटी’कडे वाटचाल सुरू असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे.

- स्मृती ईखार,नगराध्यक्ष,

नगर परिषद कळमेश्वर-ब्राह्मणी.

...

शहरात चार काेटी रुपयांची विविध विकास कामे सुरू आहेत. साेबतच स्वच्छ व सुंदर शहरावर भर दिला जात आहे. शहरात लावलेली झाडे माेठी झाल्यानंतर शहराला जिल्ह्यात ‘ग्रीन सिटी’ म्हणून ओळखले जाईल. त्यासाठी प्रयत्न सुरू असून, यात नागरिकांनी सहभागी व्हावे.

- ज्योत्स्ना मंडपे, उपाध्यक्ष,

नगरपरिषद, कळमेश्वर-ब्राह्मणी.

Web Title: Walk towards ‘Green City’ of Kalmeshwar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.