वर्धा राेडवर भिंत ताेडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:10+5:302021-06-26T04:08:10+5:30

नागपूर : वर्धा राेडवर डबल डेकर पुलाला लागून असलेल्या साई मंदिर ते अजनी मेट्राे स्टेशनपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात ...

The wall began to crack on Wardha Road | वर्धा राेडवर भिंत ताेडण्यास सुरुवात

वर्धा राेडवर भिंत ताेडण्यास सुरुवात

Next

नागपूर : वर्धा राेडवर डबल डेकर पुलाला लागून असलेल्या साई मंदिर ते अजनी मेट्राे स्टेशनपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी मनपा व महामेट्राे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सुरक्षा भिंत ताेडण्याचे काम सुरू करण्यात आले. वाहतुकीसाठी व्यवस्थित जागा उपलब्ध व्हावी म्हणून ही माेहीम राबविण्यात येत आहे.

महापाैर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी अधीक्षक अभियंता (पीडब्ल्यूडी) अजय पाेहेकर, लक्ष्मीनगर झाेनचे सहायक आयुक्त गणेश राठाेड आदींसह सुरक्षा भिंतीची पाहणी केली आणि ती पाडण्याचे निर्देश दिले. रस्त्याच्या दाेन्ही बाजूला असलेल्या ३४ घरमालकांना नुकसानभरपाई देण्यात आली व जागा ताब्यात घेतली गेली. येथे घरमालकांनी आधीपासूनच मार्किंग पूर्ण झाल्यानंतर भिंत तयार केली हाेती. जुनी भिंत पाडून वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध हाेईल.

Web Title: The wall began to crack on Wardha Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.