घराची भिंत काेसळली, महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:31+5:302021-07-14T04:11:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मनसर : माेडकळीस आलेल्या मातीच्या घराची भिंत काेसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला तर तिचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मनसर : माेडकळीस आलेल्या मातीच्या घराची भिंत काेसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती, नातू व नात असे तिघे जखमी झाले. ही घटना मनसर (ता. रामटेक) येथे रविवारी (दि. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
ललिता गणेश चिंचूलकर (४८) असे मृत महिलेचे नाव असून, जखमींमध्ये पती गणेश चिंचूलकर (५२), नात अंकिता व नातू अंशित या तिघांचा समावेश आहे. त्यांचे घर नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर येथील डाेंगरावर आहे. त्या घराचे बांधकाम विटामातीचे असून, बांधकाम जुने असल्याने ते माेडकळीस आले आहे. अंकिता व अंशित ही ललिता यांच्या मुलीचे मुले असून, दाेघेही काही दिवसापासून ललिता यांच्याकडेच राहतात. चाैघेही रविवार रात्री जेवण केल्यानंतर झाेपी गेले.
सर्व जण झाेपेत असतानाच घराची भिंत आतल्या भागाला काेसळली. त्यामुळे ललिता भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे तर इतर तिघे अंशत: दबले गेले. गणेश यांनी नातवांना बाहेर काढले. त्यांना ललिताला काढणे शक्य न झाल्याने त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बाेलावले. शेजाऱ्यांनी तिन्ही जखमींना लगेच मनसर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारसाठी नेले. तिथे उपचार केल्यानंतर त्यांना सुटीही देण्यात आली.
शेजाऱ्यांनी ढिगारा बाजूला करीत ललिता यांना बाहेर काढले. ताेपर्यंत त्यांचा जखमा व गुदमरून मृत्यू झाला हाेता. खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे यांनी साेमवारी (दि. १२) सकाळी तिघांनाही पुन्हा प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले हाेते. शिवाय, त्यांच्या उपस्थितीत तसेच तलाठ्याच्या गैरहजेरीत काेतवालाने घटनेचा पंचनामा केला. विशेष म्हणजे, या घटनेची पाेलीस दप्तरी नाेंद नाही.
....
स्थानिक लाेकप्रतिनिधीवर राेष
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जिल्हा परिषद व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री घटनास्थळ गाठले. मात्र, त्या दाेघांनाही नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागल्याने लगेच माघारी वळावे लागले. मागील वर्षी ललिता चिंचूलकर यांच्या घराजवळील एका घराची भिंत काेसळली हाेती. सुदैवाने त्यात कुणालाही दुखापत झाली नव्हती. मात्र, त्यावेळी या दाेन्ही नेत्यांनी नुकसानग्रस्ताला नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले हाेते. नुकसान भरपाईचा एक रुपयाही न मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी दाेघांवर राेष व्यक्त केला हाेता.