मूर्ती विसर्जन करू नये म्हणून नागपुरातील तलावांना लावले टिनाचे कठडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 08:49 PM2021-09-11T20:49:57+5:302021-09-11T20:50:29+5:30

Nagpur News मनपा प्रशासनाने नागपुरातील तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. तलावात विसर्जन करू नये, यासाठी सर्व तलावांना टिनांचे कठडे उभारले जात आहेत.

walls were laid on the lakes in Nagpur so that the idols would not be immersed | मूर्ती विसर्जन करू नये म्हणून नागपुरातील तलावांना लावले टिनाचे कठडे 

मूर्ती विसर्जन करू नये म्हणून नागपुरातील तलावांना लावले टिनाचे कठडे 

Next
ठळक मुद्देस्थायी समिती अध्यक्ष आरोग्य सभापतींनी केली पाहणी


लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाने शहरातील तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. तलावात विसर्जन करू नये, यासाठी सर्व तलावांना टिनांचे कठडे उभारले जात आहे. सोबतच मूर्ती विसर्जनासाठी तलावावर पर्यायी व्यवस्था केली जात आहे. ( walls were laid on the lakes in Nagpur so that the idols would not be immersed)

जलप्रदूषण टाळण्यासाठी तलावात गणेशमूर्तींच्या विसर्जनाला बंदी घातली आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे. निर्देशानुसार तलावात मूर्ती विसर्जन करू नये, यासाठी तलावांना टिनाचे कठडे लावले जात आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सेंट्रिंग ठोकून मोठे विसर्जन कुंड तसेच जमीन खोदून विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहे.

शनिवारी स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर आणि आरोग्य समिती सभापती संजय महाजन यांनी तलावाची पाहणी केली. उपायुक्त राजेश भगत, घनकचरा व्यवस्थापन नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, संबंधित झोनचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते. सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, फुटाळा या तलावांना कठडे लावण्याचे कार्य जवळपास पूर्ण झाले आहे. नाईक तलाव येथील कार्य प्रगतिपथावर आहे. प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती विसर्जन कृत्रिम कुंडातच करावे, असे आवाहन प्रकाश भोयर यांनी केले आहे.

मोबाईल कृत्रिम विसर्जन कुंड

दहाही झोनमध्ये २४८ कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात येणार आहेत. तीन अतिरिक्त फायबर कृत्रिम टँक असे १० झोन मिळून ३० टँक प्रस्तावित आहेत. प्रत्येक झोनमध्ये दोन मोबाईल कृत्रिम विसर्जन कुंड राहतील. नागरिकांच्या मागणीप्रमाणे ते घरासमोर येईल. निर्माल्य संकलनासाठी कचरागाड्या राहतील.

Web Title: walls were laid on the lakes in Nagpur so that the idols would not be immersed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.