नॉन कोविड रुग्णांची उपचारासाठी भटकंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 08:58 PM2020-09-21T20:58:17+5:302020-09-21T21:02:01+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता नियंत्रणासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. कोविड रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील ३९ खासगी रुग्णालये पूर्णत: कोविड रुग्णालये म्हणून कार्यान्वित करण्यात आली. मनपाची आरोग्य यंत्रणा कोरोना चाचणीत व्यस्त आहे. दुसरीकडे कोविडसोबतच नॉन कोविड रुग्णांवर उपचारास रुग्णालयांकडून नकार दिला जात असल्याने त्यांची भटकंती करावी लागत आहे.

Wandering for the treatment of non-covid patients! | नॉन कोविड रुग्णांची उपचारासाठी भटकंती!

नॉन कोविड रुग्णांची उपचारासाठी भटकंती!

Next
ठळक मुद्दे रिपोर्ट निगेटिव्ह असूनही डॉक्टरांचा उपचारास नकारउपचाराअभावी रुग्णांचा जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता नियंत्रणासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. कोविड रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील ३९ खासगी रुग्णालये पूर्णत: कोविड रुग्णालये म्हणून कार्यान्वित करण्यात आली. मनपाची आरोग्य यंत्रणा कोरोना चाचणीत व्यस्त आहे. दुसरीकडे कोविडसोबतच नॉन कोविड रुग्णांवर उपचारास रुग्णालयांकडून नकार दिला जात असल्याने त्यांची भटकंती करावी लागत आहे. उपचाराअभावी अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.
न्युमोनिया, मधुमेह, मलेरिया, ताप यासह विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास रुग्णांलयाकडून नकार दिला आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह असूनही डॉक्टर उपचारास नकार देत असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. झिंगाबाई टाकळी परिसरातील एका रुग्णाला न्युमोनिया झाल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही खासगी रुग्णालयांनी उपचारास नकार दिला. असाच प्रकार रमना मारोती परिसरातील एका न्युमोनियाग्रस्त रुग्णाच्या बाबतीत घडला. मलेरिया, मधुमेह, डेंग्यू रुग्णांचीही अशीच अवस्था आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या संदर्भात माहिती मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

कोविडमुळे अन्य रुग्णांवर उपचारास नकार
नागपूर शहरात ६२३ खासगी रुग्णांलये आहेत. कोविड रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील १०२ रुग्णालये निवडली आहेत. मात्र यातील ३९ रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. असे असतानाही कोविड रुग्णांसाठी तयारी सुरू असल्याचे कारण सांगून नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला जात आहे. कोविड रुग्णांकडून चांगले पैसे मिळत असल्यानेही इतर रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

डेंग्यूचेही रुग्ण वाढले
मागील काही दिवसात शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिका प्रशासनाने याकडे तातडी लक्ष देण्याची गरज आहे. यंत्रणा कोविड नियंत्रणात व्यस्त असल्याने याकडे मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाचे दुर्लक्ष असल्याने शहरात डासांचा प्रकोप वाढला आहे.

Web Title: Wandering for the treatment of non-covid patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.