जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे कोरोनाविरोधात जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 06:02 PM2020-04-13T18:02:24+5:302020-04-13T18:09:55+5:30

कोरोनाचा सर्वत्र प्रचंड उद्रेक होत असल्याचे पाहून जगातील सर्वात छोटी महिला ज्योती आमगे आता जनजागरण करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. पोलीस विभागाच्या मदतीने तिने सोमवारी विविध भागात फिरून जनजागरण केले आणि नागरिकांना घरीच रहा, सुरक्षित रहा, असा संदेश दिला.

War against Corona, the world's tallest woman's appeal | जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे कोरोनाविरोधात जनजागरण

जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे कोरोनाविरोधात जनजागरण

Next
ठळक मुद्दे नागरिकांना केले आवाहनघरातच रहा सुरक्षित रहा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा सर्वत्र प्रचंड उद्रेक होत असल्याचे पाहून जगातील सर्वात छोटी महिला ज्योती आमगे आता जनजागरण करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. पोलीस विभागाच्या मदतीने तिने सोमवारी विविध भागात फिरून जनजागरण केले आणि नागरिकांना घरीच रहा, सुरक्षित रहा, असा संदेश दिला.
नागपुरातील रहिवासी असलेली ज्योती आमगे जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून सुप्रसिद्ध आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही ज्योतीची नोंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वत्र प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. मात्र अशातही काही मंडळी बेदरकारपणा दाखवत असून हे उपद्रवी शहरातील वेगवेगळ्या भागात मोकाट फिरताना दिसत आहेत. एकटे दुखटे नव्हे तर ते घोळक्याने ठिकठिकाणी उभी असल्याचे दिसतात. एका दुचाकीवर तीन तीन जण फिरत असल्याचेही चित्र उपराजधानीत बघायला मिळत आहे. हे सर्व पाहून आपण अस्वस्थ झालो आहे त्यामुळे रस्त्यावर येऊन जनजागरण करण्याचा निर्णय घेतल्याचे ज्योती म्हणते आहे. ज्योतीने पोलिसांच्या मदतीने आज सोमवारी दुपारी साडेबारा वाजता टेलीफोन एक्स्चेंज चौक आणि विविध भागात जनजागरण केले. पोलिसांच्या जीपच्या समोरच्या भागावर अर्थात बॉनेटवर उभी राहून ज्योती जनजागरण करीत होती.
नागरिकांना उद्देशून ती काही प्रश्न करत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढत असताना तुम्ही बाहेर कशाला आलात, तुम्ही कशाला फिरत आहात, असा प्रश्न करून घरातच रहा, वारंवार सॅनिटायजर करा, साबण वापरा, हात धुवा आणि स्वच्छता राखा, असा संदेशही ज्योती देत होती. दरम्यान, तिला पत्रकारांनी या संबंधाने विचारणा केली असता, अशा भयावह स्थितीत नागरिकांची बेफिकिरी पाहून आपल्याला खूप राग येत असल्याचे ज्योती म्हणाली कोरोना चा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची सुरक्षा स्वत: घेणे आवश्यक आहे पोलीस जनजागरण करीत करीत आहेत. नागरिकांना बाहेर फिरू नका, घरातच रहा, असे आवाहन करीत आहेत, मात्र अनेक जण पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाही. ते बेफिकिरीने बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे हा प्रकार संतापजनक असल्याचे ज्योती म्हणाली. पोलीस त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. मात्र आपली काळजी आपणच घेण्याचे आणि आपली सुरक्षा आपणच करण्याचे प्रत्येकाची कर्तव्य आहे, असेही ज्योती म्हणाली. ज्योतीच्या या जागरणामुळे नागरिकांवर किती प्रभाव पडतो त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांना सहकार्य करा
कोरोना पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पोलीस आपले घर, आपले कुटुंबीय मागे ठेवून अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र काही मंडळी जाणीवपूर्वक घराबाहेर फिरून पोलिसांचा त्रास वाढवत आहेत, हे योग्य नसून आपण सर्वांनीच पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे, असे ज्योती आमगे म्हणाली.

Web Title: War against Corona, the world's tallest woman's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.