विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 09:30 PM2021-06-12T21:30:17+5:302021-06-12T21:33:38+5:30
torrential rains मान्सूनच्या आगमनानंतर हवामान विभागाने संपूर्ण आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तविला आहे. असे असले तरी सुरुवातीचे दोन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मान्सूनच्या आगमनानंतर हवामान विभागाने संपूर्ण आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तविला आहे. असे असले तरी सुरुवातीचे दोन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मागील २४ तासांत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. यामुळे विदर्भाचे तापमान ३४ अंश सेल्सिअसखाली आले आहे. नागपूर शहराच्या तापमानातही कालच्या पेक्षा १.७ अंश सेल्सिअसने घट झाली असून पारा २९.४ वर घसरला आहे. शहरातील रात्रीच्या पावसामुळे वातावरण बरेच थंडावले होते. यामुळे सकाळी आर्द्रता ९८ टक्के नोंदविण्यात आली. दिवसभरात ढगाळ वातावरण असले तरी काही काळी ऊन-सावलीची पाठशिवणी सुरू होती. यामुळे सायंकाळी ही आर्द्रता ७६ टक्के नोंदविली गेली.
मागील २४ तासांत विदर्भात सर्वच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. यामुळे काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. चंद्रपुरात सर्वाधिक ८०.६ मिमी, तर नागपुरात ६४.४ मिमी पावसाची नोंद झाली.
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३४.२ : २१.६
अमरावती : ३०.४ : २०.१
बुलडाणा : ३२.० : २३.४
चंद्रपूर : ३१.६ : २१.०
गडचिरोली : ३०.० : २४.०
गोंदिया : ३२.० : २२.६
नागपूर : २९.४ : २१.३
वर्धा : २९.२ : २१.३
वाशिम : ३४.० : १८.६
यवतमाळ : २९.० : अप्राप्त
विदर्भातील पर्जन्यमान (२४ तासांतील)
जिल्हा : पर्जन्यमान
अकोला : १५.६ मिमी
अमरावती : २४.४ मिमी
बुलडाणा : ०.० मिमी
चंद्रपूर : ८०.६ मिमी
गडचिरोली : ८.० मिमी
गोंदिया : ३६.४ मिमी
नागपूर : ६४.४ मिमी
वर्धा : ३३.८ मिमी
वाशिम : ३०.० मिमी
यवतमाळ : अप्राप्त