नागपूरच्या लाहोरी डीलक्स बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटवर वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 09:29 PM2019-01-24T21:29:35+5:302019-01-24T21:31:02+5:30

महापालिकेच्या धरमपेठ झोन क्षेत्रातील गाडगा वॉर्ड क्रमांक ७० येथील लाहोरी डीलक्स बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट यांच्याकडे मालमत्ता कर २००८ सालापासून थकीत आहे. ३.८३ लाखांची थकबाकी न भरल्याने धरमपेठ झोनच्या पथकाने गुरुवारी वॉरंट बजावण्याची कारवाई केली.

Warrant on the Lahori Deluxe Bar & Restaurant at Nagpur | नागपूरच्या लाहोरी डीलक्स बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटवर वॉरंट

नागपूरच्या लाहोरी डीलक्स बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटवर वॉरंट

Next
ठळक मुद्देधरमपेठ झोनची कारवाई : २.७० लाखांची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या धरमपेठ झोन क्षेत्रातील गाडगा वॉर्ड क्रमांक ७० येथील लाहोरी डीलक्स बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट यांच्याकडे मालमत्ता कर २००८ सालापासून थकीत आहे. ३.८३ लाखांची थकबाकी न भरल्याने धरमपेठ झोनच्या पथकाने गुरुवारी वॉरंट बजावण्याची कारवाई केली.
गाडगा वॉर्ड क्रमांक ७० येथील घर क्रमांक ९७/८, ९७/८/१, ९७/७ ९७/७ बी आणि ९७/बी/४ येथे लाहोरी डीलक्स बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट आहे. मालमत्ता कराची थकीत रक्कम भरण्यासंदर्भात वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली. त्यानंतरही थकबाकी न भरल्याने झोनचे पथक वॉरंट घेऊ न पोहचले. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने दोन-तीन दिवसाची मुदत मागितली. परंतु पूर्वानुभव लक्षात घेता ही मागणी धुडकावली. थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देताच २.७० लाखांचा धनादेश देण्यात आला. तसेच उर्वरित थकबाकी १५ दिवसात भरण्याची हमी दिली. ही कारवाई झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक गोपल रुसिआ, धनराज हेमाने, अरविंद ढवळे, अशोक खेडकर, दीपक स्वामी, अरूण मेहरुलीया, प्रसाद चेपे यांच्यासह कर विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Warrant on the Lahori Deluxe Bar & Restaurant at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.