असा झाला राजकीय बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:19+5:302021-08-29T04:11:19+5:30
विकास आणि तक्रारी रस्ते, नाल्या, आधुनिक जलतरण तलाव, अद्ययावत वाचनालय, शहरातील स्वच्छता, हिरव्यागार झाडांनी गत पाच वर्षात काटोल शहराचा ...
विकास आणि तक्रारी
रस्ते, नाल्या, आधुनिक जलतरण तलाव, अद्ययावत वाचनालय, शहरातील स्वच्छता, हिरव्यागार झाडांनी गत पाच वर्षात काटोल शहराचा मेकओव्हर झाला. मात्र गुंठेवारी प्रकरण, भूमिगत नाली बांधकामातील चौकशा, भूखंड विभागणी, पालिकेतील एसीबीची दोन अधिकाऱ्यावर कारवाई, निकृष्ट कामांच्या तक्रारी आणि सत्ताधारी नगरसेवकावर दाखल झालेले गुन्ह्यामुळे पालिका चर्चेतही राहिली. त्यामुळे काटोलकर मतदार यावेळी न.प.निवडणुकीत सत्तेच्या राजकारणाला की विकासला कौल देतात, हे पुढील पाच महिन्यात स्पष्ट होईल.
---
२०१७ मध्ये पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षाची थेट जनतेतून निवड झाली होती. सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झालेल्या जागेसाठी ९ उमेदवार रिंगणात होते. यात विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर यांनी ९,६०९ मते घेत बाजी मारली. शेकापच्या अर्चना देशमुख यांना ७५०८ मते मिळाली होती. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या भाजपच्या प्रेरणा बारोकर यांनी २६८८ मते घेतली होती. यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडल्या जाणार आहे. यासोबतच नगराध्यक्षपद कोणत्या संवर्गासाठी राखीव राहते, हेही महत्त्वाचे ठरले.