वाहतूक शाखेचा व्हॉटस्अॅप
By admin | Published: July 6, 2016 03:09 AM2016-07-06T03:09:20+5:302016-07-06T03:09:20+5:30
शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांनी व्हॉटस्अॅप सुरू केले आहे.
सुरक्षित वाहतुकीसाठी सूचना करा : पोलिसांचे आवाहन
नागपूर : शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांनी व्हॉटस्अॅप सुरू केले आहे. त्यावर नागरिकांनी सूचना आणि उपाययोजना पाठविण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
पोलिसांच्या या व्हॉटस्अॅपचा क्रमांक ९०११३८७१०० आहे. विविध भागातील वाहतुकीच्या समस्या किंवा अडसर असल्यास त्याचीही सचित्र माहिती या नंबरवर नागरिक पाठवू शकतील. वाहतुकीचे नियमन व नियंत्रण योग्यरीतीने तसेच जलदपणे कसे करता यावे, या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेतर्फे हे अॅप सुरू करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
नो पार्र्किंग झोनमध्ये उभी करण्यात आलेली तसेच पिकअप व्हॅनद्वारे उचलण्यात आलेली वाहने हा विषय नेहमीच वादग्रस्त आहे. त्यासंदर्भात काही तक्रारी, सूचना असल्यास ०७१२ २५६६६५८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही पोलीस विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)