ऊर्जा प्रकल्पांत प्रक्रिया केलेले सांडपाणी

By Admin | Published: April 13, 2017 03:05 AM2017-04-13T03:05:24+5:302017-04-13T03:05:24+5:30

राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे.

Wastewater processed in energy projects | ऊर्जा प्रकल्पांत प्रक्रिया केलेले सांडपाणी

ऊर्जा प्रकल्पांत प्रक्रिया केलेले सांडपाणी

googlenewsNext

ऊर्जामंत्र्यांची माहिती : राज्यात सर्व ठिकाणी करणार बंधनकारक
नागपूर : राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे. राज्यातील पाण्याचा अपव्यय टळावा व सांडपाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी राज्य शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिली. ‘नीरी’ येथे आयोजित ‘विकसनशील देशांतील एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ते बोलत होते.
ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. विशेषत: औष्णिक ऊर्जा प्रकल्पांत तर जास्त पाणी लागते. शेतीसाठी पुरविले जाणारे पाणी येथे जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र दुसरीकडे शहरांमध्ये लाखो लिटर सांडपाणी वाहून जाताना दिसून येते. या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग ऊर्जा प्रकल्पांमध्ये होऊ शकतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पाण्याच्या कमतरतेचा फटका राज्यातील अनेक ऊर्जा प्रकल्पांना बसला आहे.

बावनकुळेंच्या अभ्यासाने विदेशी संशोधक थक्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीत चंद्रशेखर बावनकुळे व्यस्त असतानादेखील ते १० मिनिटांसाठी या कार्यक्रमात सहभागी झाले. मात्र त्यांच्या रुचीचा विषय असल्यामुळे अर्ध्या तासाहून अधिक काळ त्यांनी आपले विचार मांडले. भाषणादरम्यान त्यांनी विविध आकडेवारी मांडली तसेच अनेक संकल्पनांवरदेखील भाष्य केले. नवीन प्रयोगाबाबतची त्यांची अभ्यासू वृत्ती व त्यांचे सखोल ज्ञान पाहून देशविदेशातील संशोधकदेखील थक्क झाले. कार्यक्रम झाल्यानंतरदेखील बावनकुळे यांच्या भाषणाबाबत संशोधकांमध्ये कौतुक ऐकायला मिळत होते.

Web Title: Wastewater processed in energy projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.