दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या १७ रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:37 AM2019-07-30T11:37:19+5:302019-07-30T11:37:46+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने रायपूर, बिलासपूर आणि नागपूर विभागातील एकूण १७ रेल्वेस्थानकांवर ४१९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

Watch through CCTV on 17 railway stations of South East Central Railway | दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या १७ रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या १७ रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्हीद्वारे वॉच

Next
ठळक मुद्देअसामाजिक तत्त्वांवर अंकुश ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने रायपूर, बिलासपूर आणि नागपूर विभागातील एकूण १७ रेल्वेस्थानकांवर ४१९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वेस्थानकावरील असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यास मदत होत असून हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इतवारी रेल्वेस्थानकावर १९, कामठीत १३, तुमसर १३, गोंदियात ८७, बालाघाटमध्ये १२, डोंगरगडमध्ये १५, राजनांदगाव १५, भंडारात १३ आणि छिंदवाडात ८ अशा ९ रेल्वेस्थानकांवर १९५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर रायपूर विभागात रायपूर ७६, दुर्ग २४, डीआरएम कार्यालयाच्या परिसरात ७ असे एकूण १०७ सीसीटीव्ही लावण्यात आले. बिलासपूर विभागात रायगड ९, चांपा ८, बिलासपूर ८५, शहडोल ८, कोरबा स्टेशन ८ अशा महत्त्वाच्या ५ रेल्वेस्थानकांवर ११८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रेल्वेस्थानकाचे निरीक्षण करण्यात येत आहे. या सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून प्लॅटफार्म तसेच रेल्वेस्थानक परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे. यामुळे असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावणे सोयीचे झाले आहे. एखादी घटना घडल्यास त्वरित सीसीटीव्हीमधील फुटेज तपासून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि लोहमार्ग पोलिसांमार्फत आरोपींवर त्वरित कारवाई करण्यात येते. यामुळे गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: Watch through CCTV on 17 railway stations of South East Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे