आंभाेरा उपसा सिंचन याेजनेचे पाणी साेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:26+5:302021-07-08T04:07:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : परिसरात धान राेवणी व पिकांसाठी याेग्य असा पाऊस अद्यापही झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सिंचनासाठी पाणी साेडण्यात यावे, यासाठी शेतकरी आंभाेरा उपसा सिंचन याेजना कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता सिद्धार्थ वाहने यांच्याकडे नुकतेच निवेदन साेपविले. दाेन-तीन दिवसात पाणी न साेडल्यास उपसा सिंचन याेजनेच्या कार्यालयासमाेर धरणे आंदाेलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून आंभाेरा उपसा सिंचन याेजना २००५ पासून कार्यान्वित करण्यात आली. या याेजनेद्वारे दरवर्षी पाणी उपलब्ध हाेत असल्याने या भागातील शेतकरी खरीप हंगामात धान व साेयाबीन पीक घेतात; परंतु आता जलसंपदा विभाग आंभाेरा उपसा सिंचन याेजनेत शेतकऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, अशी सूचना गावागावांत दवंडीद्वारे देत आहे. एकीकडे काेराेनामुळे सर्वत्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरीसुद्धा अडचणीत आहेत. अशावेळी शेतकरी थकबाकी भरणार कशी, हा प्रश्नच आहे.
वेलतूर, बाेथली, गाेन्हा, चिखली, तुडका, ताराेली, शिकारपूर, फेगड, रेंगातूर, पचखेडी, खैरलांजी, मदनापूर, किन्ही, शिवनी, परसाेडी, बाेरी आदी गावांतील शेतकऱ्यांसाठी ही उपसा सिंचन याेजना वरदान ठरली आहे. परंतु प्रशासनाच्या हेकेखाेर धाेरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, जलसंपदा विभागाने पिकांच्या ओलितासाठी तत्काळ पाणी साेडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, जि. प. सदस्य कविता साखरवाडे, माजी सरपंच प्रभाकर चौधरी, ज्ञानिवंत साखरवाडे, राजू चाैधरी, उमेश महाकाळकर, हरिदास लुटे, राजेंद्र कावळे, राजू लिमजे आदींसह शेतकरी उपस्थित हाेते.
...
दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही?
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दरवर्षी पाणी मिळते, मग यंदा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत यामध्ये वरिष्ठ अधिकारी राजकारण करीत असल्याचा गंभीर आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहायक अभियंत्यांना पाणी न साेडण्याबाबत ताेंडी सूचना दिल्या असल्याने स्थानिक अभियंता पाणी साेडू शकत नाही. म्हणजेच वरिष्ठ स्तरावरूनच पाणी न साेडण्यासाठी षडयंत्र असल्याचे जाणकारांचे मत आहे. आंभाेरा उपसा सिंचन याेजनेकडे दुर्लक्ष करून सिंचनासाठी पाणी साेडण्यास टाळाटाळ केली जात आहे.