अर्ध्या नागपूरवर जलसंकट

By admin | Published: November 15, 2014 02:44 AM2014-11-15T02:44:27+5:302014-11-15T02:44:27+5:30

शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा बाभुळखेडा गावाजवळ फुटला आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवस या कालव्याने नागपूरला येणारे पाणी खंडित होणार आहे.

Water Conquest at Half Nagpur | अर्ध्या नागपूरवर जलसंकट

अर्ध्या नागपूरवर जलसंकट

Next

नागपूर : शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा बाभुळखेडा गावाजवळ फुटला आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवस या कालव्याने नागपूरला येणारे पाणी खंडित होणार आहे. याचा परिणाम पश्चिम, दक्षिण व मध्य नागपुुरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. अर्ध्या नागपूर शहराला १६ नोव्हेंबरपर्यंत मर्यादित पाणी पुरवठा होणार असून पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
पेंच प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून प्रामुख्याने नागपूर शहरातील पश्चिम, मध्य व दक्षिण भागातील वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. कालवा फुटल्याने या भागाला १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान मर्यादित व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आॅरेज सिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यु)ने वर्तविली आहे.
पेंच नवेगाव खैरी प्रकल्पाचा ७ कि.मी.लांबीचा कालवा बाभुळखेडा गावाजवळ फुटला आहे. त्यामुळे या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कालव्याचा प्रवाह थांबला आहे.
नारुस्त कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ते लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा बांधकाम विभागाला आहे.
विशेष म्हणजे पेंच टप्पा २ च्या जलशुद्धीकरण केंद्रातून प्रामुख्याने पश्चिम, दक्षिण व मध्य नागपुुरातील वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. पेंच टप्पा २ जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्णपणे महादुला पम्पींगवर अवलंबून आहे. त्यामुळे १६ नोहेंबरपर्यंत या भागाचा पाणी पुरवठा बाधित होणार आहे. लोकांची गैरसोेय होणार आहे. पाणी पुरवठ्याची माहिती जाणून घेण्याचे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे.

Web Title: Water Conquest at Half Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.