पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:42+5:302021-05-05T04:14:42+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहरातील अंतर्गत भागात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन बेलेकर ले-आऊटमध्ये फुटली. त्यामुळे पाण्याची नासाडी हाेत ...

Water leaks due to pipeline rupture | पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी

पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : शहरातील अंतर्गत भागात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन बेलेकर ले-आऊटमध्ये फुटली. त्यामुळे पाण्याची नासाडी हाेत असून, या भागातील बेलेकर शाळेजवळ पाण्याचे माेठे डबके तयार झाले. दुसरीकडे, शहरातील नवजीवन काॅलनीत राहणाऱ्या नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे.

कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील बहुतांश जलस्रोत दूषित असल्याने नागरिकांना नळाच्या पाण्यावर अवलंबून राहण्यावाचून गत्यंतर नाही. उन्हाळा असल्याने गर्दीपासून सुटका करण्यासाठी प्रत्येकाने घरी कूलर लावले आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याचा पुरवठा व वापर लक्षात घेता, शहरातील नवजीवन काॅलनीसह अन्य काही भागात दाेन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाताे. त्यातच बेलेकर ले-आऊटमध्ये असलेल्या बेलेकर शाळेजवळ पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फुटली. शाळेजवळ पाण्याचे डबके तयार झाले असून, पाण्याची नासाडी हाेत आहे.

ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी तिथे खड्डा खाेदून फुटलेली पाईप दुरुस्त केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी पुन्हा पाईप लाईन फुटली. याला आता सहा दिवस पूर्ण झाले असून, पालिका प्रशासनाने येथील पाईप लाईन दुरुस्त करण्याची तसदी घेतली नाही, असा आराेप नवजीवन काॅलनीतील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे राेज फारच कमी पाणी मिळत असल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली असून, ही समस्या साेडविण्याची मागणी केली आहे.

...

नवजीवन काॅलनीला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने या भागात कमी पाणीपुरवठा केला जात आहे. येथील फुटलेला पाईप याआधी दुरुस्ती केला हाेता. ताे पुन्हा फुटल्याने समस्या निर्माण झाली. ही समस्या साेडविण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना सूचना केली जाईल.

- स्मृती इखार, नगराध्यक्ष,

नगर परिषद, कळमेश्वर-ब्राह्मणी.

...

फुटलेल्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम एकदा करण्यात आले. त्यानंतर पुन्हा पाईप लाईन फुटल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला देण्यात आली. पाईप दुरुस्तीचे काम लवकरच केले जाईल. नागरिकांना काही समस्या असल्यास त्यांनी आपल्याला कळवाव्या.

- स्मिता काळे, मुख्याधिकारी,

नगर परिषद, कळमेश्वर-ब्राह्मणी.

Web Title: Water leaks due to pipeline rupture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.