लॉकडाऊनमध्येच तोडली पाण्याची लाईन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:41+5:302021-06-25T04:07:41+5:30

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात गरीब कामगारांच्या वस्त्यात अनेकजण धान्य, भोजन वितरित करीत होते. याच दरम्यान प्रभाग २४ कळमना परिसरातील ...

Water line broken in lockdown () | लॉकडाऊनमध्येच तोडली पाण्याची लाईन ()

लॉकडाऊनमध्येच तोडली पाण्याची लाईन ()

Next

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात गरीब कामगारांच्या वस्त्यात अनेकजण धान्य, भोजन वितरित करीत होते. याच दरम्यान प्रभाग २४ कळमना परिसरातील चिखली वस्तीत पिण्याच्या पाण्याची लाईन कापण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत येथील नागरिक टँकरचे पाणी पित आहेत. मूलभूत सुविधात पाण्याशिवाय गडरलाईन, रस्ते आदींची कामेही येथे होताना दिसत नाहीत.

स्थानिक रहिवासी सतनाम सिंह यांनी सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान येथील पिण्याच्या पाण्याची लाईन कापण्यात आली. लॉकडाऊनमध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन कापणे चुकीचे होते. गडरलाईनचे कामही करण्यात येत नाही. अब्दुर कदीर म्हणाले, वस्तीतील समस्यांबाबत विभागाचे आमदार व नगरसेविका यांना अनेकदा माहिती देण्यात आली. परंतु नागरिकांना दिलासा मिळाला नाही. स्थानिक सामाजिक कार्यकर्ता किरण हेडाऊ म्हणाले, त्यांनी वस्तीतील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यानंतर येथे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गरीब, कामगारांच्या मूलभूत सुविधांबाबत राजकारण करण्यात येऊ नये. नगरसेवकांनी विकासासाठी संपूर्ण प्रभागात काम करण्याची गरज आहे. येथे रस्ते, लाईट, स्वच्छतेशी निगडित अनेक कामे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

................

वस्तीत कनेक्शन दिले जाऊ शकत नाही

‘चिखलीतील वस्तीत अनधिकृत पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन होते. या वस्तीत टॅक्स लागू करण्यात आला नाही. येथील महिलांना घेऊन झोन कार्यालयात समस्या मांडल्या. दरम्यान येथे महापालिका कनेक्शन देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले.’

-सरिता, कावरे, नगरसेविका

...............

Web Title: Water line broken in lockdown ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.