जलवाहिनी फोडली ; नागपुरात बिल्डकॉन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 08:35 PM2018-01-30T20:35:54+5:302018-01-30T20:40:53+5:30

केसीसी बिल्डकॉन प्रा.लि. कंपनीच्या खोदकामामुळे वारंवार जलवाहिनी फोडली  जात आहे. याची गंभीर दखल घेत ओसीडब्ल्यूने या कंपनीच्या विरोधात सदर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Water pipe line broke; Resitered FIR against buildcom company in Nagpur | जलवाहिनी फोडली ; नागपुरात बिल्डकॉन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल

जलवाहिनी फोडली ; नागपुरात बिल्डकॉन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे२३ दशलक्ष लिटर पाण्याची नासाडी : २७ वेळा जलवाहिनी फोडण्याच्या घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या राजनगर, विजयनगर, छावणी, बैरामजी टाऊ न व मेकोसाबाग वस्त्यांतील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून अधूनमधून पाणीपुरवठा होत नाही. अचानक पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागते. केसीसी बिल्डकॉन प्रा.लि. कंपनीच्या खोदकामामुळे वारंवार जलवाहिनी फोडली  जात आहे. याची गंभीर दखल घेत ओसीडब्ल्यूने या कंपनीच्या विरोधात सदर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम बिल्डकॉन कंपनी करीत आहे. काम करताना कधी १५० मि.मी. व्यासाची तर कधी ३०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. गेल्या काही महिन्यांत २७ वेळा जलवाहिनी फोडण्यात आली. यामुळे २३ दशलक्ष लिटर पाण्याची नासाडी झाली. एका जलकुंभाची क्षमता २२ लाख दशलक्ष लिटर असते. १५ हजार नागरिकांना ते पाणी वापरण्यासाठी पुरेसे असते. जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा २८ वेळा बाधित झाला. यामुळे या परिसरातील नागरिकांना कधी १२ तास तर कधी २४ तास पाणी मिळाले नाही. गेल्या शनिवारी पुन्हा अचरज टॉवरजवळ जलवाहिनी फोडल्याने ओसीडब्ल्यूने कंपनीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला.

Web Title: Water pipe line broke; Resitered FIR against buildcom company in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.