नागपूर विभागातील जलसाठे गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:23 AM2021-07-22T00:23:03+5:302021-07-22T00:23:35+5:30

Water reserves in Nagpur division पावसाची टक्केवारी समाधानकारक सांगितली जात असली तरी नागपूर आणि अमरावती विभागातील सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी रिकामे असल्याची स्थिती आहे. अमरावती आणि नागपूर विभागात मागील वर्षी २१ जुलै या दिवशी ४३.६२ टक्के जलसाठा होता. यंदा या दिवशी ३४.१३ टक्के जलसाठा असल्याची नोंद झाली आहे.

Water reserves in Nagpur division are 10 percent empty than last year | नागपूर विभागातील जलसाठे गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी रिकामे

नागपूर विभागातील जलसाठे गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी रिकामे

Next
ठळक मुद्देनागपूर विभागाची स्थिती वाईट : विदर्भातील अनेक प्रकल्पात ५० टक्क्यांच्या आतच जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पावसाची टक्केवारी समाधानकारक सांगितली जात असली तरी नागपूर आणि अमरावती विभागातील सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे गतवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी रिकामे असल्याची स्थिती आहे. अमरावती आणि नागपूर विभागात मागील वर्षी २१ जुलै या दिवशी ४३.६२ टक्के जलसाठा होता. यंदा या दिवशी ३४.१३ टक्के जलसाठा असल्याची नोंद झाली आहे.

अमरावती विभागात मोठे, मध्यम आणि लघु मिळून ४४६ प्रकल्प आहेत तर नागपूर विभागात ३८४ प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पातील सरासरी जलसाठा ३४.१३ असल्याची बुधवारची नोंद आहे. बहुतेक प्रकल्प अद्यापही पूर्ण भरलेले नाहीत. अनेक प्रकल्पमध्ये ५० टक्क्यांच्या आतच जलसाठा असून केवळ बोटावर मोजण्याएवढेच प्रकल्प ७० टक्क्यांच्या वर भरले आहेत.

...

नागपूर विभागात जलसाठा कमी

अमरावती विभागाच्या तुलनेेत नागपूर विभागात कमी जलसाठ्याची नोंद झाली आहे. अमरावती विभागात १० मोठे प्रकल्प असून ते ४७.५७ टक्के भरले आहेत. मागील वर्षी याच दिवशी त्यांची नोंद ५२.५८ टक्के होती. नागपूर विभागात १० मोठे प्रकल्प असून ते फक्त ३८.८ टक्के भरले आहेत. मागील वर्षी त्यात ५४.४४ टक्के जलसाठा होता. यावरून नागपूर विभागातील स्थिती लक्षात येते.

अमरावती विभागामध्ये मध्यम प्रकल्प २५ असून साठा ३६.२ टक्के आहे. मागील वर्षी तो २ टक्क्यांनी अधिक होता. नागपृूर विभागात ४२ प्रकल्प असून जलसाठा फक्त ११.९७ टक्के आहे. मागील वर्षी तो ३१.६८ टक्के होता.

अमरावती विभागात लघु प्रकल्प ४११ असून जलसाठ्याची नोंद १०.५४ टक्के झाली आहे. मागील वर्षी ती कमी म्हणजे ७.२२ टक्के होती. तर नागपूर विभागात ३२६ लघु प्रकल्प असून साठा फक्त १०.४२ टक्के आहे. मागील वर्षी तो ३१.६८ टक्के होता.

...

मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती

अमरावती विभाग

काटेपूर्णा : ४०.३१

वाण : ३२.८५

उर्ध्र्व प्रकल्प : ४५.७१

नळगंगा : २८.४१

खडकपूर्णा : ३.९४

पेनटाकळी : ३१.१५

बेंबळा : ६५.६९

इसापूर : ५९.४९

अरुणावती : ४०.३९

पूस : ..

नागपूर विभाग

गोसेखुर्द : २७.५१

बावनथडी : ३२.३७

आसोलामेंढा : ७१.४४

दिना : २१.६१

सिरपूर : ७.८४

इटियाडोह : २६.५८

पुजारीटोला : ३२.८

कालिसरार : ..

खिंडसी : ३०.०४

वडगाव : ४८.५८

तोतलाडोह : ५९.१२

नांद : ४४.२५

पेंच : ६८.७२

निम्न वर्धा : ६७.८

बोर : ४०.३९

Web Title: Water reserves in Nagpur division are 10 percent empty than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.