धामणा येथील घरात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:25+5:302021-07-23T04:07:25+5:30
धामणा (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजतापासून पावसाचा जाेर वाढायला सुरुवात झाली हाेती. या संततधार पावसामुळे नेरी-धामणा ...
धामणा (ता. नागपूर ग्रामीण) परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजतापासून पावसाचा जाेर वाढायला सुरुवात झाली हाेती. या संततधार पावसामुळे नेरी-धामणा आणि धामणा-शिरपूर मार्गावरील नदी व नाल्यांना पूर आला हाेता. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, कंपनीत काम करणारे कर्मचारी, कामगार व नागरिक पुरात काही काळ अडकले हाेते. त्यांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. धामणा येथील काही घरांमध्ये पावसाचे तुंबलेले पाणी शिरल्याने घरांमधील धान्य व रासायनिक खते भिजल्याने नुकसान झाले आहे.
...
बडेगाव शिवार पाण्याखाली
बडेगाव (ता. सावनेर) परिसरात गुरुवारी दुपारी ३ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे संपूर्ण शिवार, शेतांमधील विविध पिके व रस्ते पाण्याखाली आले हाेते. त्यामुळे नागरिकांना रहदारीस अडचणीही येत हाेत्या. या पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. मात्र, पावसाचा जाेर रात्रभर कायम राहिल्यास पूरसदृश स्थिती निर्माण हाेण्याची व पिकांचे नुकसान हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...
खेकरानाला जलाशयात ६८ टक्के पाणीसाठा
या पावसामुळे बडेगाव (ता. सावनेर) नजीकच्या खाेकरानाला या जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या जलाशयात गुरुवारी सायंकाळपर्यंत ६८ टक्के पाणीसाठा गाेळा झाला हाेता. पावसाचा जाेर कायम राहिल्यास या जलाशयातील पाणी साेडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कन्हान नदीकाठच्या गावांना गुरुवारी सायंकाळी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
...
पिकांना संजीवनी
उमरेड शहरासह संपूर्ण तालुक्यात बुधवार (दि. २१) सकाळीपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे तालुक्यातील साेयाबीन, कपाशी, तुरीसह अन्य पिकांना संजीवनी मिळाली आहे तर काहींनी धानाच्या राेवणीलाही सुरुवात केली आहे.. तालुक्यात गुरुवारी सकाळीपर्यंत ६२.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामातील ही सर्वाधिक पावसाची नाेंद आहे. तालुक्यात आजवर ३९७.२० मिमी पाऊस काेसळल्याची नाेंद करण्यात आली. आतापर्यंत उमरेड मंडळामध्ये (महसूल) ५९७.२ मिमी, सिर्सी मंडळात ४९० मिमी, बेला मंडळात ४३७.९ मिमी, हेवती मंडळात ३३९.४ मिमी, मकरधोकडा मंडळात २७७.५ मिमी तर पाचगाव मंडळात २५०.९ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. हा पाऊस पिकांना पोषक असल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून, शेतकऱ्यांनी मशागतीचे याेग्य नियाेजन करण्याचे आवाहनही केले आहे.
...