मेट्राेच्या बांधकाम साईटवर झिरपले फुटाळ्याचे पाणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:08 AM2021-02-25T04:08:46+5:302021-02-25T04:08:46+5:30
नागपूर : फुटाळा तलावासमाेर हाेत असलेले मेट्राेच्या पार्किंग व्यवस्थेचे बांधकाम सध्या वेगळ्याच कारणाने खाेळंबले आहे. बांधकामाच्या खाेदलेल्या तीन-चारही खड्ड्यात ...
नागपूर : फुटाळा तलावासमाेर हाेत असलेले मेट्राेच्या पार्किंग व्यवस्थेचे बांधकाम सध्या वेगळ्याच कारणाने खाेळंबले आहे. बांधकामाच्या खाेदलेल्या तीन-चारही खड्ड्यात पाणी लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दाेन दिवस माेटरपंप लावून पाणी काढण्याचे प्रयत्न झाले पण खड्ड्यातील पाणी कमी हाेईना झाले. त्यामुळे बांधकाम बंद करण्याची पाळी कंत्राटदारावर आल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फुटाळा तलावाची पाण्याची पातळी ३ ते ४ फूटाने घटल्याचे समाेर आले हाेते. तलावाच्या विरुद्ध बाजूला कृषी विद्यापीठाच्या जागेवर मेट्राेच्या पार्किंग प्लाझाचे काम वेगाने सुरू आहे. कामासाठी वापरात असलेल्या माेठमाेठ्या मशीन्सच्या आवाजामुळे तलावाच्या भूजल वाहिन्या विस्कळीत किंवा खंडित झाल्या असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यातून पाणी झिरपत असल्याने पातळी कमी हाेत असल्याची भीती व्यक्त करीत सर्वेक्षण संस्थाद्वारे अभ्यास करण्याची मागणी करण्यात आली हाेती. कामादरम्यान परिसरातील अनेक झाडे ताेडण्यात आली. दरम्यान तीन दिवसांपासून बांधकामाच्या खाेदलेल्या खड्ड्यामध्ये आपाेआप पाणी जमा झाले. येथील एका कामगाराने दिलेल्या माहितीनुसार पाणी काढण्यासाठी शक्तिशाली माेटर लावण्यात आल्या पण पाणी आटले नाही. ते आणखी झिरपत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काम बंद करावे लागल्याचे संबंधित कामगाराने सांगितले.
कुठे आहे हेरिटेज कमिटी
भाेसले काळात बांधलेले तेलंगखेडी अर्थात फुटाळा तलाव हा ग्रेड-१ चा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाची जबाबदारी प्रशासनावर आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विद्यापीठ व महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. विशेष म्हणजे नागपूर शहराचे वारसा स्थळे जाेपासण्यासाठी हेरिटेज कमिटी तयार करण्यात आली आहे. मात्र फुटाळाच काय पण शहरातील काेणतेच वारसास्थळ संवर्धनासाठी कमिटीने पुढाकार घेतला नाही. शहरवासीयांना या कमिटीबाबत पुसटशी माहितीही नाही. मग या कमिटीचे काम काय, असा सवाल विचारला जात आहे.
विनंती करूनही सर्वेक्षण नाही
फुटाळा तलाव अनेक भागातून डॅमेज झाला आहे. वायुसेनानगरच्या भागाकडून सुरक्षा भिंत काेलमडली आहे. टीन लावून डागडुजी करण्यात आली आहे. इतरही भागात भिंतीला तडे गेले आहेत. जलस्तर घटत चालला आहे. शिवाय बांधकाम सुरू झाल्यानंतर भूजल वाहिन्या खंडित हाेण्याचीही भीती आहे. त्यामुळे जीएसआय, पुरातत्व विभागाच्या वैज्ञानिकांद्वारे तलावाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी पर्यावरण कार्यकर्त्यांनी वारंवार केली. मात्र ना ऑडिट झाले ना सर्वेक्षण करण्यात आले.
वारसा स्थळे, झाडे किंवा पर्यावरण यांची विकासाच्या नावाने सातत्याने हेळसांड चालली आहे. फुटाळा तलावाबाबत हेच घडताना दिसत आहे. माेठमाेठी स्वप्न रंगवली आहेत पण तलावाचे अस्तित्वच राहणार नाही तर या साैंदर्यीकरणाला अर्थ काय राहणार, याचा विचार करायला हवा. दुर्दैवाने तसे हाेताना दिसत नाही.
- शरद पालिवाल, पर्यावरण अभ्यासक