गुरुवारी, शुक्रवारी २८ जलकुंभांवरून पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:09+5:302021-09-02T04:15:09+5:30

मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीसाठी शटडाऊन : पूर्व नागपुरातील पुरवठा बाधित लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कन्हान जलशुद्धिकरण ...

Water supply from 28 water tanks closed on Thursday and Friday | गुरुवारी, शुक्रवारी २८ जलकुंभांवरून पाणीपुरवठा बंद

गुरुवारी, शुक्रवारी २८ जलकुंभांवरून पाणीपुरवठा बंद

Next

मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीसाठी शटडाऊन : पूर्व नागपुरातील पुरवठा बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कन्हान जलशुद्धिकरण केंद्रावरून शहराकडे येणाऱ्या १३०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती उद्भवली आहे. दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतला जाणार आहे. यामुळे उद्या, गुरुवारी सकाळी १० ते शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी पाचपर्यंत २८ जलकुंभांवरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरूनगर आणि आशीनगर झोनमधील २८ जलकुंभांचा यात समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल. ४८ तास कमी दाबाने पाणी मिळणार आहे. आधी बुधवारी शटडाऊन घेतला जाणार होता, यात बदल केला आहे.

शटडाऊनदरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी केले आहे.

...

पाणीपुरवठा बाधित राहणारे जलकुंंभ

आशीनगर झोन : बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झिस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग.

सतरंजीपुरा झोन : बस्तरवारी १, २ अ व २ब, शांतीनगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावेनगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग.

नेहरूनगर झोन : नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ

लकडगंज झोन : भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनीमातानगर, सुभाननगर, कळमना व पारडी १ व २ जलकुंभ.

Web Title: Water supply from 28 water tanks closed on Thursday and Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.