२८ जलकुंभांचा पाणीपुरवठा आज बाधित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:19+5:302021-01-15T04:09:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरण, कामठी यांनी ३३ केव्ही आणि ११ केव्ही या विद्युत वाहिनीवर आज शुक्रवारी ...

Water supply of 28 water tanks will be disrupted today | २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा आज बाधित राहणार

२८ जलकुंभांचा पाणीपुरवठा आज बाधित राहणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरण, कामठी यांनी ३३ केव्ही आणि ११ केव्ही या विद्युत वाहिनीवर आज शुक्रवारी सकाळी १० ते २ दरम्यान ४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कन्हान जलशुद्धीकरण केंद्र ४ तासाकरिता बंद राहणार असल्याने या जलशुद्धीकरण केंद्रावर आधारित लकडगंज , सतरंजीपुरा, नेहरूनगर व आशीनगर झोनमधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या वस्त्या

आशीनगर झोन : बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झिस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग.

सतरंजीपुरा झोन : बस्तरवारी १, २ अ व २ ब, शांतीनगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावेनगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग

नेहरूनगर झोन : नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ.

लकडगंज झोन : भांडेवाडी, देशपांडे ले-आऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमातानगर, सुभाननगर, कळमना व पारडी १ व २ जलकुंभ आदींचा समावेश आहे. शटडाऊनदरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महारपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी केले आहे.

Web Title: Water supply of 28 water tanks will be disrupted today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.